वाघाशी झुंज देऊन वाचविले स्वत:चे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 11:41 PM2017-07-29T23:41:20+5:302017-07-29T23:42:17+5:30

शेतातून घरी परत येत असताना झुडूपात लपून बसलेल्या वाघाने अचानक पाठीमागून हल्ला केला.

vaaghaasai-jhaunja-daeuna-vaacavailae-savatacae-paraana | वाघाशी झुंज देऊन वाचविले स्वत:चे प्राण

वाघाशी झुंज देऊन वाचविले स्वत:चे प्राण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : शेतातून घरी परत येत असताना झुडूपात लपून बसलेल्या वाघाने अचानक पाठीमागून हल्ला केला. मानेखालील भागाला पंजे मारून समोर उडी घेतली. दुसºयांदा हल्ला करण्याच्या बेतात वाघ असतानाच हातातील कुºहाडीने वाघाचा हल्ला परतवून लावल्याची घटना रवी-कोंढाळा मार्गालगत शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
शिवदास वासुदेव चौके (४०) रा. रवी असे हिंमतीने वाघासोबत झूंज देणाºया नागरिकाचे नाव आहे. आरमोरी तालुक्यातील रवी, कोंढाळा, कासवी, उसेगाव, मुल्लूर चक गावातील जंगल परिसरात मागील चार महिन्यांपासून पट्टेदार वाघाचे वास्तव्य आहे. आजपर्यंत या वाघांनी कोंढाळा येथील लवाजी मेश्राम व रवी येथील वामन मराप्पा या दोन इसमांचा बळी सुध्दा घेतला आहे. शनिवारी शिवदास वासुदेव चौके व रवींद्र श्रावण कामठे हे सकाळी रवी ते कोंढाळा रस्त्यालगत असलेल्या शेतात गेले होते.
शेताची पाहणी करून दोघेही परत यायला निघाले. दरम्यान रवी, कोंढाळा रस्त्यालगत असलेल्या जंगलातून बकºयांना चारा नेण्याच्या उद्देशाने झाडाच्या फांद्या तोडत होता. दरम्यान झुडूपात लपून बसलेल्या वाघाने शिवदास चौके यांच्यावर पाठीमागून झडप घेतली. त्याच्या पाठीवर पंजा मारून समोर उडी घेतली. पुन्हा वाघाने शिवदास याच्यावर समोरून हल्ला केला. मात्र त्याचवेळी शिवदासने हातात असलेल्या कुºहाडीने वाघाचा प्रतिकार केला. वाघ आणि शिवदास हे जवळपास पाच मिनिटे एकमेकांसमोर उभे होते. दरम्यान त्याच्या जवळच असलेला सोबती रवींद्र कामटे हा मदतीला धावून आला. त्यामुळे वाघाने पळ काढला.
घाबरलेल्या अवस्थेत दोघेही गावाकडे परतले. त्याचवेळी जंगल परिसरात गस्तीवर असलेल्या वन विभागाच्या पथकाला ही माहिती दिली. वन विभागाच्या कर्मचाºयांनी शिवदास याला आरमोरी येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वन परिक्षेत्राधिकारी तांबटकर यांनी दोन हजार रूपयांची तातडीची मदत दिली.
त्या वाघांचा बंदोबस्त करा
घटनेची माहिती मिळताच आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार आनंदराव गेडाम, जि.प. सदस्या मनिषा दोनाडकर, माजी जि.प. सदस्य लक्ष्मी मने, वेणू ढवगाये, पं.स. उपसभापती यशवंत सुरपाम, पं.स. सदस्य वृंदा गजभिये, देसाईगंजचे उपवनसंरक्षक फुले, वनाधिकारी बोईलकर, कांबळे, वन परिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर आदी उपस्थित होते. त्या ठिकाणी असलेल्या वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी राजकीय पदाधिकारी व नागरिकांनी केली आहे.

Web Title: vaaghaasai-jhaunja-daeuna-vaacavailae-savatacae-paraana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.