आश्रमशाळेतील पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 01:30 AM2018-08-18T01:30:14+5:302018-08-18T01:31:22+5:30
रेगडी येथील शासकीय आश्रम शाळेतील शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. येथील रिक्त पदे भरावीत, अशी मागणी पालकांनी प्रशासनाकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : रेगडी येथील शासकीय आश्रम शाळेतील शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. येथील रिक्त पदे भरावीत, अशी मागणी पालकांनी प्रशासनाकडे केली आहे.
मागील शैक्षणिक सत्रात ऐन परीक्षाचे तोंडावर एका विद्यार्थिनीचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर येथील प्राचार्य एच. ए. नन्नावरे व अधीक्षक टी. के. आत्राम यांच्या कामाची चौकशी करण्यासाठी शासनाने नन्नावरे व आत्राम यांना मे २०१८ मध्ये निलंबित केले. त्यामुळे रेगडी आश्रम शाळेचा प्रभार शिक्षक गेडाम यांच्याकडे व अधीक्षकाचा प्रभार शिक्षक शेंडे यांच्याकडे देण्यात आला. मागील शैक्षणिक सत्रापासून येथील शिक्षक व अन्य कर्मचाºयांची पदे रिक्त आहेत.
शासकीय आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते बारावीमध्ये ४३६ विद्यार्थी आहेत. सध्या प्राचार्य पदाचा प्रभार गेडाम यांच्याकडे व अधीक्षक पदाचा प्रभार शेडे यांच्याकडे आहे. आश्रमशाळेत उच्च माध्यमिक शिक्षकाचे १, प्राथमिक शिक्षक ३, माध्यमिक मुख्याध्यापक १ पद, अधीकक्ष पुरूष १ पद, ग्रंथपाल १ पद, प्रयोग शाळा १ पद, चौकीदार १ पद, सफाई कामगार १ पद व कामाठीचे १ पद असे एकूण १० ते ११ पद रिक्त असून आश्रमशाळा प्रशासनाने मागील व यंदाच्या शैक्षणिक सत्रात येथील रिक्त पदे भरण्याची मागणी केली होती. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष झाले. प्रशासनस्तरावर पत्र व्यवहार करण्यात आला. परंतु काहीच उपयोग झाला नाही. तर प्रशासनाने मानधनावर ३ प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती केली. मात्र उर्वरित महत्त्वाची पदे अजूनही रिक्तच आहेत. शिक्षणावर परिणाम होत आहे.
या संदर्भात प्राचार्य गेडाम यांनी आपल्याकडे आठ दिवसांपूर्वी शाळेचा प्रभार सोपविण्यात आला. त्यामुळे रिक्त पदांबाबत काहीही सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली.