तिसरी लाट येण्यापूर्वी सर्वांचे लसीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:26 AM2021-06-03T04:26:14+5:302021-06-03T04:26:14+5:30
कोरोना संसर्गामुळे आजपर्यंत लाखो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. काेराेनाबाबत सर्व देशवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या संसर्गापासून बचावासाठी लसीकरण हाच ...
कोरोना संसर्गामुळे आजपर्यंत लाखो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. काेराेनाबाबत सर्व देशवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या संसर्गापासून बचावासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, आजपर्यंत देशात लसीकरणाचे प्रमाण नगण्य असल्याने कोरोना संकटाची तलवार लोकांच्या मानेवर अजूनही लटकत आहे.
१८ ते ४४ वर्षे वयोगटातील अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत, तर पहिली लस घेतलेल्या अनेकांना अद्याप दुसरा डाेस मिळाला नाही. केंद्र शासनाकडून लसीचा पुरवठा याेग्य प्रकारे हाेत नसल्याने लसीकरणाच्या कामात अडचणी येत असल्याच्या तक्रारी राज्य सरकार करीत आहे. या सर्व गोंधळात जनता मात्र लसीकरणापासून वंचित आहे, ही अतिशय गंभीर व धोकादायक बाब आहे. बिकट स्थितीत सरकारने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी पुरेशी लस उपलब्ध करून नागरिकांना वेळीच देणे गरजेचे आहे, असे पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष राेहिदास राऊत यांनी म्हटले आहे.