रांगी आरोग्य केंद्राअंतर्गत १,५४२ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:23 AM2021-07-03T04:23:13+5:302021-07-03T04:23:13+5:30
लसीकरण मोहीम सर्वत्र सुरू आहे मात्र वेगवेगळे गैरसमज लोकांमध्ये निर्माण झाल्याने गाव खेड्यातील लोक सहज लसीकरणासाठी तयार होत नाही. ...
लसीकरण मोहीम सर्वत्र सुरू आहे मात्र वेगवेगळे गैरसमज लोकांमध्ये निर्माण झाल्याने गाव खेड्यातील लोक सहज लसीकरणासाठी तयार होत नाही. यासाठी आरोग्य कर्मचारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांना मोठी कसरत करावी लागत आहे. मात्र आता शासनाकडून कोविड लसीकरणाबाबत जनजागृती होत असल्याने कोविड लस घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र रांगीच्या वतीने अंतर्गत गावामध्ये लसीकरण जनजागृती करण्यात आली. ३० जून रोजी रांगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण शिबिर घेण्यात आले. यामध्ये एकूण ७२ लोकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये पहिला ६८ तर दुसरा डोस चार जणांनी घेतला. आतापर्यंत रांगी प्राथमिक आरोग्य केंद्र व सर्व उपकेंद्रामार्फत पहिली लस घेणाऱ्या १,३७४ लोकांचे लसीकरण केले आहे तर दुसरी लस घेणाऱ्या १६८ नागरिक असे एकूण १,५४२ लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यासाठी रांगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सय्याम, औषधी संयोजक अंकित हेमके, आरोग्य सेविका हिचामी, इतर कर्मचारी सहकार्य करत आहेत.
020721\img-20210630-wa0004.jpg
रांगी येथे लसीकरण करताना