रामाळात जनावरांवर ७०० डाेस लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:38 AM2021-07-27T04:38:16+5:302021-07-27T04:38:16+5:30
शिबिराला जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती प्रा. रमेश बारसागडे, रामाळ्याचे सरपंच अरुण देवतळे, उपसरपंच रवी पाल, पंचायत समितीचे ...
शिबिराला जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती प्रा. रमेश बारसागडे, रामाळ्याचे सरपंच अरुण देवतळे, उपसरपंच रवी पाल, पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. सागर डुकरे, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी देविदास देव्हारे, भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, साईनाथ बुराडे, अतुल भिरकुरवार, मारोती उपलवार, नागेश्वर दुर्कीवार, मुखरू मंगर, नारायण गुरनुले, सुमित वडपल्लीवार, भाऊ खोब्रागडे, दादाजी वैरागडे व पशुपालक उपस्थित होते. शिबिरात शेळ्या व मेंढ्यांवर ४०० डाेस लसीकरण करण्यात आले तर गाय, बैल, म्हशी आदी जनावरांवर घटसर्पाचे ३०० डोस लसीकरण करण्यात आले. पावसाळा सुरू असल्याने पाळीव जनावरांचे लसीकरण करावे तसेच शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन व विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय याेजनांचा लाभ घेऊन विकास साधावा, असे आवाहन प्रा. रमेश बारसागडे यांनी केले.