काेराेना काळातही मुलांचे लसीकरण जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:34 AM2021-02-14T04:34:54+5:302021-02-14T04:34:54+5:30
गडचिराेली : लहान बालकांचे आराेग्य सुदृढ राहण्यासाठी व त्याची याेग्य वाढ हाेण्यासाठी जन्मल्यापासून पाच वर्षापर्यंत विविध लसी दिल्या जातात. ...
गडचिराेली : लहान बालकांचे आराेग्य सुदृढ राहण्यासाठी व त्याची याेग्य वाढ हाेण्यासाठी जन्मल्यापासून पाच वर्षापर्यंत विविध लसी दिल्या जातात. काेराेना संसर्गाच्या प्रादुर्भावाने लसीकरण कार्यक्रमावर काेणताही परिणाम झाला नाही. एप्रिलपासून २०२० ते जानेवारी २०२१ अखेरपर्यंत जवळपास १४ हजारपेक्षा अधिक बालकांना लसीचे अत्यावश्यक डाेज देण्यात आले. काेराेना महामारीच्या काळात आराेग्य यंत्रणेवर ताण पडला असला तरी लसीकरणापासून एकही बालक वंचित राहिला नाही, अशी माहिती जि.प.च्या आराेग्य विभागाने दिली आहे.
शासनाच्या वतीने माता व बालकांच्या आराेग्यासाठी विविध कार्यक्रम राबविले जातात. महिला गर्भवती राहिल्यापासून तर मुलगा पाच वर्षांचा हाेईपर्यंत सार्वजनिक आराेग्य संस्थांमधून विविध प्रकारच्या लसीकरणाचा कार्यक्रम पार पाडला जाताे. बालक जन्मल्यापासून २४ तासाच्या आत हेपिटेडीज बी, आयपीव्ही ही काविड आजारावर प्रतिबंधात्मक लस दिली जाते. त्यानंतर दीड महिन्याने, त्यानंतर २८ दिवसांनी, त्यानंतर ९ महिने पूर्ण झाल्यावर व त्यानंतर १६ महिने पूर्ण झाल्यावर आवश्यक त्या लस दिल्या जातात. विशेष म्हणजे, या सर्व लस शहरी व ग्रामीण भागात आराेग्य विभागाच्या माेफत स्वरूपात दिल्या जातात.
काेराेना संसर्गाच्या भीतीने एप्रिलपासून ऑक्टाेबर महिन्यापर्यंत साधारणत: सात ते आठ महिने अत्यावश्यक कामाशिवाय नागरिक घराबाहेर पडले नाही. काेराेनाचा लसीकरण कार्यक्रमावर परिणाम हाेईल, अशी शक्यता हाेती. मात्र आराेग्य विभागाच्या याेग्य नियाेजनामुळे स्थानिकपातळीवर लसीचा पुरवठा झाल्याने लसीकरण कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे आशावर्कर व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून बालकांना अत्यावश्यक लस देण्यात आल्या.
बाॅक्स....
कधी, काेणती लस आवश्यक
- जन्मानंतर २४ तासाच्या आत - एपीटेटीज बी, बीसीजी
- दीड महिन्यानंतर - पेंटा वन, ओपीव्ही वन
- २८ दिवसांनी - पेंटा टू, ओपीव्ही टू
- त्यानंतर पुन्हा २८ दिवसांनी - पेंटा थ्री, ओपीव्ही थ्री
- नऊ महिन्यानंतर - एमआर वन, एमआर टू
- १६ महिन्यानंतर २४ महिन्यांपर्यंत - डीपीटी बुस्टा
बाॅक्स....
या राेगावरील प्रतिबंधात्मक लस
जन्मापासून तर पाच वर्षापर्यंतच्या मुलांना आराेग्य विभागाच्या कार्यक्रमानुसार वेगवेगळ्या लस दिल्या जातात. काविड राेगावर प्रतिबंधात्मक हॅपिटेटीज बी लस दिली जाते. निमाेनिया व इतर आजारासाठी पेंटा वन, टू, थ्री लस दिली जाते. शिवाय पाेलिओ आजार हाेऊ नये, यासाठी पाेलिओचा डाेज दिला जाताे. याशिवाय गाेवर व खाेकला हाेऊ नये, यासाठी डीपीटी बुस्टा ही लस दिली जाते.
काेट......
प्रत्येक महिन्याच्या मंगळवार व शुक्रवारला बालकांच्या लसीकरणाचा कार्यक्रम आयाेजित केला जाताे. काेराेना संसर्गाच्या काळात ग्रामीण भागात अंगणवाडी कार्यकर्त्या व आशावर्करच्या माध्यमातून बालकांना आवश्यक त्या लसी देण्यात आल्या. आवश्यक लस मिळाली नाही, अशी एकही तक्रार काेणत्याही पालकाकडून आमच्याकडे प्राप्त झाली नाही. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहिला नाही.
- डाॅ.विनाेद चाैधरी, सहायक जिल्हा आराेग्य अधिकारी, गडचिराेली
काेट....
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक क्षेत्रात लसीकरणाचा कार्यक्रम प्रभावित झाला. दरम्यान १४ दिवसानंतर प्रतिबंधात्मक क्षेत्र वगळल्यावर आराेग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या व आशावर्कर पाेहाेचून तेथील बालकांना अत्यावश्यक लस देण्यात आल्या. लसीकरणाचा कार्यक्रम प्रतिबंधात्मक क्षेत्रात लांबणीवर पडला असला तरी काेणताही बालक लस घेण्यापासून वंचित राहिला नाही. पूर परिस्थितीमुळे संपर्क तुटणाऱ्या जिल्ह्यातील २४० गावांमध्ये पावसाळ्यापूर्वीच लसीचा पुरवठा करण्यात आला. मान्सूनपूर्व माेहीम राबवून तेथील बालकांना आवश्यक ती लस देण्यात आली.
- डाॅ.समीर बन्साेडे, जिल्हा माता व बाल संगाेपन अधिकारी, गडचिराेली