धान राेवण्या आटाेपल्या लसीकरणाची गती वाढणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:38 AM2021-09-03T04:38:13+5:302021-09-03T04:38:13+5:30
१६ जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या कालावधीत नागरिकांमुळे काेराेना प्रतिबंधात्मक लसविषयी भीती असल्याने नागरिक लस घेत नव्हते. त्यानंतर ...
१६ जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या कालावधीत नागरिकांमुळे काेराेना प्रतिबंधात्मक लसविषयी भीती असल्याने नागरिक लस घेत नव्हते. त्यानंतर प्रशासनाने नागरिकांमध्ये जागृती करण्यास सुरुवात केल्याने लसीकरणास सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला. जवळपास एप्रिल महिन्यापासून बऱ्याच प्रमाणात लसीकरण हाेऊ लागले. ग्रामीण भागातील नागरिकही लस घेत हाेते; मात्र जुलै महिन्यापासून राेवणीच्या कामाला सुरुवात झाल्याने लसीकरणाकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येत हाेते. काेराेनाची लस घेतल्यानंतर अंगदुखीचा त्रास एक ते दाेन दिवस हाेतो. राेवणीच्या कालावधीत दाेन दिवस घरी राहणे शक्य हाेत नाही. त्यामुळे गावात शिबिरांचे आयाेजन करूनही नागरिक लस घेत नसल्याचे दिसून येत हाेते.
आता धान राेवणीची कामे आटाेपली आहेत. निंदणाची कामे सुरू आहेत; मात्र या कामाची फारशी घाई राहत नाही. त्यामुळे नागरिक आता लसीकरणासाठी पुढे येत आहेत. ज्या गावांमध्ये लसीकरण शिबिरांचे आयाेजन केले जात आहे. त्या ठिकाणी नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे.