तरुणांच्या लसीकरणाची ज्येष्ठांना सतावतेय चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:39 AM2021-05-21T04:39:08+5:302021-05-21T04:39:08+5:30
गडचिराेली : ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण जाेमात सुरू असले तरी १८ ते ४४ वर्ष वयाेगटातील नागरिकांना ...
गडचिराेली : ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण जाेमात सुरू असले तरी १८ ते ४४ वर्ष वयाेगटातील नागरिकांना लसीकरिता ऑनलाइन नावनाेंदणी करताना अडचणी येत आहेत. ग्रामीण भागात ही समस्या बिकट आहे, तर शहरी भागात ज्या दिवशी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागते त्या दिवशी काही मिनिटांतच ऑनलाइन मागणीची मर्यादा संपुष्टात येत असल्याने अनेक युवक लसीकरणापासून वंचित राहत आहेत. याची चिंता त्याच कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना सतावत आहे.
शहरासह ग्रामीण भागातील अनेक युवक काेराेना प्रतिबंधक लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. शहरी भागात ऑनलाइन नाेंदणीसाठी चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. परंतु ग्रामीण भागात ऑनलाइन सेवेतील अडचणी तसेच प्राथमिक आराेग्य केंद्र स्तरावर १८ ते ४४ वर्ष वयाेगटासाठी लस उपलब्ध नसल्याने युवकांचा हिरमाेड हाेत आहे. ज्या कुटुंबातील ज्येष्ठ व ४५ वर्षांवरील नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक लसीचा पहिला व दुसरा डाेस घेतला आहे, असे नागरिक आपल्या कुटुंबातील तरुणांचे लसीकरण केव्हा हाेणार, याची प्रतीक्षा करीत आहेत. या परिस्थितीसाठी मागणीच्या तुलनेत असलेला तुटवडा कारणीभूत आहे.
काेट .........
कुटुंबातील तरुण व्यक्ती मेहनत करून सर्व सदस्यांचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या भरवशावरच कुटुंब चालत असते. त्यामुळे तरुणांचे आराेग्य उत्तम राहावे, काेराेनाकाळात संसर्ग हाेऊ नये, यासाठी काेराेना प्रतिबंधक लस मिळणे आवश्यक आहे.
- मधुकर चुधरी
काेट .........
ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देऊन त्यांचे लसीकरण सुरुवातीलाच करण्यात आले. परंतु ज्यांच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी असते असे तरुण अद्यापही प्रतिबंधक लसीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे त्यांना लवकर लसीचा लाभ द्यावा.
- वासुदेव वाघाडे
काेट ........
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बहुतांश युवक जिल्हा व तालुकास्तरावर गवंडीसह विविध कामांसाठी येतात. काेराेना संसर्गाचा धाेका कायम असल्याने त्यांनाही लागण हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरुणांनाही प्राधान्याने लस मिळावी.
- श्रीकृष्ण शेंडे