विद्यार्थ्यांना देणार गोवर व रूबेलाची लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:33 AM2018-08-22T00:33:01+5:302018-08-22T00:33:41+5:30

गोवर व रूबेला या आजारांच्या लस जिल्हा परिषद शाळा, शासकीय आश्रमशाळा, खासगी शाळांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. ९ ते १५ वर्ष वयाच्या प्रत्येक बालकाला सदर लस द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केली.

Vaccine of gover and rubella will be given to students | विद्यार्थ्यांना देणार गोवर व रूबेलाची लस

विद्यार्थ्यांना देणार गोवर व रूबेलाची लस

Next
ठळक मुद्देनोव्हेंबर महिन्यात नियोजन : ९ ते १५ वर्ष वयोगटातील बालक लाभार्थी; शाळांच्या मदतीने आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गोवर व रूबेला या आजारांच्या लस जिल्हा परिषद शाळा, शासकीय आश्रमशाळा, खासगी शाळांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. ९ ते १५ वर्ष वयाच्या प्रत्येक बालकाला सदर लस द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केली.
नियोजन सभागृहात सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ.साजीद, डॉ.कामरान, युनिसेफचे कन्सल्टंट डॉ.ज्योती पोतरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.सुनील मडावी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनोद म्हशाखेत्री, बाह्यनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.बाघराज धुर्वे, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी लांबतुरे, लॉयन्स क्लबच्या अध्यक्ष स्मिता लडके आदी उपस्थित होते.
गर्भवती महिलांमध्ये रूबेला या आजाराच्या संसर्गामुळे गर्भाचा मृत्यू होतो किंवा जन्मत: अपंगत्व असलेले बालक जन्माला येते. हे बालक रूबेला सिद्रोम म्हणून ओळखले जाते. गोवर आजारामुळेही बालकांचा मृत्यू होतो. या दोन्ही आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात जिल्हाभरात गोवर व रूबेला लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. यापूर्वी जरी लसीकरण झाले असले तरी बालकांना गोवर व रूबेलाचे लसीकरण करावे, ज्याप्रमाणे पल्स पोलिओ मोहीम जिल्हाभरात राबवून ती यशस्वी केली जाते. त्याचप्रमाणे गोवर व रूबेला लसीकरण मोहीम सुद्धा यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांनी मार्गदर्शन करताना गोवर व रूबेला लसीकरण मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. याकरिता सर्वांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी राबवावी, सदर मोहीम राबविण्यात शिक्षण विभागाची महत्त्वाची भूमिका आहे. प्रत्येक शाळेने त्यांच्या शाळेतील ९ ते १५ वर्ष वयाच्या मुलांची यादी अद्यावत करावी, त्याप्रमाणे लसीकरणाचे नियोजन करावे, असे मार्गदर्शन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांनी प्रास्ताविकादरम्यान लसीकरण मोहिमेच्या आयोजनाबाबतची माहिती दिली.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉ.अनुपम महेश्वर, आनंद मोडक यांनी सहकार्य केले.

Web Title: Vaccine of gover and rubella will be given to students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.