विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी वाहिली ‘बाबूजी’ जवाहरलालजींना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2022 05:00 AM2022-07-03T05:00:00+5:302022-07-03T05:00:15+5:30
माजी खा. माराेतराव काेवासे, गाेंडवाना विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डाॅ. श्रीराम कावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या डाॅक्टर सेलचे प्रदेश महासचिव डाॅ. प्रमाेद साळवे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसनअली गिलानी, सामाजिक कार्यकर्ते मनाेहर हेपट, विनायक बाेरकर, विश्वजित काेवासे, रक्त संक्रमण अधिकारी डाॅ. किशाेर ताराम, ‘लाेकमत’चे कार्यालय प्रमुख डाॅ. गणेश जैन, जिल्हा प्रतिनिधी मनाेज ताजने, ‘लाेकमत’ समाचारचे जिल्हा प्रतिनिधी हरीष सिडाम, सखी मंचच्या जिल्हा संयाेजिका रश्मी आखाडे आदी प्रामुख्याने उपस्थित हाेते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : ‘लाेकमत’ वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक, स्वातंत्र्यसंग्राम सेनानी आणि राज्याचे माजी आराेग्य व उद्याेगमंत्री जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली. यानिमित्त येथील प्रेस क्लब भवनात आदरांजलीसह रक्तदान शिबिराचेही आयाेजन केले हाेते.
माजी खा. माराेतराव काेवासे, गाेंडवाना विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डाॅ. श्रीराम कावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या डाॅक्टर सेलचे प्रदेश महासचिव डाॅ. प्रमाेद साळवे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसनअली गिलानी, सामाजिक कार्यकर्ते मनाेहर हेपट, विनायक बाेरकर, विश्वजित काेवासे, रक्त संक्रमण अधिकारी डाॅ. किशाेर ताराम, ‘लाेकमत’चे कार्यालय प्रमुख डाॅ. गणेश जैन, जिल्हा प्रतिनिधी मनाेज ताजने, ‘लाेकमत’ समाचारचे जिल्हा प्रतिनिधी हरीष सिडाम, सखी मंचच्या जिल्हा संयाेजिका रश्मी आखाडे आदी प्रामुख्याने उपस्थित हाेते.
रक्तदानासाठी चातगावच्या साळवे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी आणि सखी मंचच्या सदस्यही सरसावल्या होत्या. मात्र वजन, हिमोग्लोबिनचे प्रमाण या अटींमुळे त्यापैकी काहीजणींना रक्तदानापासून वंचित राहावे लागले.
मात्र, बोरकर पेट्रोल पंपचे संचालक विनायक बोरकर आणि नलिनी बोरकर या दाम्पत्याने आपल्या लग्नाचा वाढदिवस आणि बाबूजींच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान करण्याची परंपरा यावर्षीही कायम ठेवली.
रक्त संकलनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डाॅ. किशाेर ताराम यांच्या मार्गदर्शनात रक्तपेढी विभागाच्या चमूने विशेष मेहनत घेतली.
या मान्यवरांनी वाहिली बाबूजींना आदरांजली
खासदार अशोक नेते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे, माजी नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक-यादव, गडचिरोलीचे प्रथम नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, भाजपच्या आदिवासी आघाडीचे प्रदेश संघटनमंत्री प्रकाश गेडाम, काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक सतीश विधाते, समशेरखाँ पठान, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि माजी न. प. उपाध्यक्ष प्रकाश ताकसांडे, शिवसेनेचे शहराध्यक्ष रामकिरीत यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी न. प. सभापती विजय गोरडवार, प्रा. डॉ. प्रकाश किरकिरे, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे मुनिश्वर बोरकर, गोंडवाना विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकारी वर्षा कोल्हे यांच्यासह ‘लोकमत’ सखी मंचच्या सदस्य, वार्ताहरांनी बाबूजींच्या प्रतिमेला पुष्प वाहून आदरांजली व्यक्त केली.