वैद्यराजांनी जाणली वनौषधींची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2022 05:00 AM2022-04-16T05:00:00+5:302022-04-16T05:00:33+5:30
प्रशिक्षणाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले विठ्ठल घोगरे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना पारंपरिक औषधीबद्दल माहिती दिली. डॉ.गोगुलवार यांनी वनऔषधी कशाप्रकारे तयार करायची याबद्दल मार्गदर्शन केले तर वनौषधी कशी ओळखायची याबद्दल मिलिंद उमरे यांनी मार्गदर्शन केले. वनौषधी ओळख व उपचार याबद्दल नंदाजी चलाख यांनी मार्गदर्शन केले. दुर्धर रोगांवर आयुर्वेदिक उपचाराबाबत कालीपद मलिक यांनी मार्गदर्शन केले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली वनविभागाच्या वतीने जिल्ह्यातील माडिया व आदिम प्रवर्गाच्या वैद्यराज व वनौषधी लागवड करणाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन स्थानिक मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील टीपागड सभागृहात करण्यात आले होते. दरम्यान, वैद्यराजनी विविध वनौषधी व गुणकारी रोपांची माहिती जाणली.
प्रशिक्षण कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गडचिरोली वनवृताचे वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय नागपूरचे अधीक्षक रवींद्र राऊत, गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, सहायक प्राध्यापक डॉ. घनश्याम कोडवानी, दत्तात्रय काटकर, डॉ. मनीष भोयर, सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके, सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) अनिल सोमनकर, प्रभू सादमवार, प्रमोद वरगंटीवार, सुधाकर गौरकार आदी उपस्थित हाेते.
प्रशिक्षणाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले विठ्ठल घोगरे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना पारंपरिक औषधीबद्दल माहिती दिली. डॉ.गोगुलवार यांनी वनऔषधी कशाप्रकारे तयार करायची याबद्दल मार्गदर्शन केले तर वनौषधी कशी ओळखायची याबद्दल मिलिंद उमरे यांनी मार्गदर्शन केले. वनौषधी ओळख व उपचार याबद्दल नंदाजी चलाख यांनी मार्गदर्शन केले. दुर्धर रोगांवर आयुर्वेदिक उपचाराबाबत कालीपद मलिक यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संचालन नेताजी अन्नपत्रवार यांनी तर आभार सहा. वनसंरक्षक सोनल भडके यांनी केले.या जिल्ह्यातील वैद्यराज,वनौषधी लागवड लाभार्थ्यांची उपस्थिती होती तर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी अपेक्षा शिंदे,वनपाल के,एम फाये, वनरक्षक शीतल कुळसंगे आदींनी सहकार्य केले.
गोंडवाना हर्ब्स प्रकल्पाला भेट
- उपस्थित मान्यवर व वैद्यराजनी गोंडवाना हर्ब्स येथे भेट दिली. दरम्यान, हनुमंत नरोटे यांनी गोंडवाना हर्ब्स प्रकल्पाविषयी माहिती दिली. प्रकाश उरकुडे यांनी वनौषधी तयार करून रोगांवर उपचाराबाबत मार्गदर्शन केले तसेच मध्यवर्ती रोपवाटिकेला भेट देऊन विविध वनौषधी व गुणकारी रोपांची माहिती जाणून घेतली.