हक्कासाठी ओबीसी महिलांनी बांधली वज्रमूठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:35 AM2021-02-12T04:35:02+5:302021-02-12T04:35:02+5:30
गडचिराेली : ओबीसींचे आरक्षण, शिष्यवृत्तीसह विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी २२ फेब्रुवारी राेजी ओबीसी महामाेर्चाचे आयाेजन करण्यात आले ...
गडचिराेली : ओबीसींचे आरक्षण, शिष्यवृत्तीसह विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी २२ फेब्रुवारी राेजी ओबीसी महामाेर्चाचे आयाेजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने येथील धानाेरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात गडचिराेली शहरातील ओबीसी प्रवर्गातील महिलांची बैठक गुरूवारी पार पडली. माेर्चात माेठ्या संख्येने सहभागी हाेऊन शासनाला हक्क देण्यासाठी भाग पाडू, असा निर्धार महिलांनी बैठकीत केला. बैठकीला प्रामुख्याने नगरसेविका वर्षा बट्टे, कुसूम भाेयर, ललीता ब्राम्हणवाडे, संध्या येलेकर, अनुसया ठाकरे, मीनाक्षी ठाकरे, सुनीता वरारकर, संध्या बाेबाटे, कविता हिवरकर, ललीता हर्षे, ऐश्वर्या लाकडे, विमल भाेयर, सुनीता चरडुके, मंगला कारेकर, साेनाली पुण्यापवार, दुर्गा काटवे, नीलिमा राऊत, नम्रता कुतरमारे, अल्का दाेनाडकर, अर्चना भाेयर, वैशाली दुधबावरे, उज्ज्वला दुधबावरे, अंजली काेठारे, दिलीप भाेयर, वैशाली चलाख आदींसह बहुसंख्य महिला उपस्थित हाेत्या.
गडचिराेली जिल्ह्यात ओबीसी प्रवर्गाची लाेकसंख्या माेठी आहे. मात्र आजपर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी गडचिराेली जिल्ह्यातील तसेच पूर्व विदर्भातील ओबीसींना त्यांचे संविधानात्मक न्याय व हक्क देण्यासाठी पुढाकार घेतला नाही. परिणामी आरक्षण, शिष्यवृत्ती, पदाेन्नती, शिक्षण, वसतिगृह, राेजगार यासह ओबीसींचे विविध प्रश्न आजही कायम आहेत. आता १ लाख पेक्षा अधिकारी ओबीसी लाेकांचा जिल्हा कचेरीवर माेर्चा काढून ओबीसी समाजातील असंताेषाचा आवाज मुंबई व दिल्लीपर्यंत पाेहाेचविण्याचा निर्धार जिल्ह्यातील ओबीसी बांधव व भगिनींनी केला आहे. त्या अनुषंगाने तालुकास्तरावर व माेठ्या गावांमध्ये प्रचंड उत्साह नियाेजनाच्या सभा सुरूआहेत.