पर्यावरणाच्या ऱ्हासाचे परिणाम सांगितल्यास संवर्धनाचे मूल्य रुजेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:33 AM2021-08-01T04:33:54+5:302021-08-01T04:33:54+5:30
आरमोरी तालुक्यातील मानपूर (देलनवाडी ) येथील स्वामी विवेकानंद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात बाहेरगावाहून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटप व ...
आरमोरी तालुक्यातील मानपूर (देलनवाडी ) येथील स्वामी विवेकानंद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात बाहेरगावाहून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटप व वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हेमलता परसा, जिल्हा परिषद सदस्य संपत आडे, प्राचार्य सी.एल. कापकर, प्रा. व्ही. एस. जुआरे, एन. व्ही. वाढई, प्रा. अरुण बुरे, जे. एम. पठाण, राजू खुने, प्रा. ए. पी. भेंडारकर, चंद्रकांत ढेगरे, हिरामण बांडे, डी. डब्ल्यू. जंवजाळकर, प्रा. रोशनी दिवटे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन डी. डी. मैद यांनी केले तर आभार प्रा. अशोक जुआरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील हस्तक, वसंता वाकडे, ऋषी वासेकर, भास्कर हलामी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
310721\img_20210730_135212.jpg
फोटो..वृक्षारोपण करताना शिक्षणाधिकारी निकम व परसा