रानभाजी महोत्सवात मांडल्या विविध प्रकारच्या भाज्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:37 AM2021-08-15T04:37:13+5:302021-08-15T04:37:13+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती नीता ढोरे हाेत्या. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार कल्याणकुमार डहाट, जिल्हा परिषद सदस्या मनीषा दोनाडकर, ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती नीता ढोरे हाेत्या. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार कल्याणकुमार डहाट, जिल्हा परिषद सदस्या मनीषा दोनाडकर, माविमच्या व्यवस्थापिका यामिनी मातेरे, तालुका कृषी अधिकारी टी. डी. ढगे उपस्थित होते. रानभाज्या पूर्णतः नैसर्गिक व रसायनमुक्त असतात. त्या ऋतुमानानुसार उगवतात. रानभाज्या खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रानभाज्यांबद्दल आदिवासी समाजात पूर्वापार ज्ञान आहे. त्यांच्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे ज्ञान प्रसारित व्हावे, असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले. संचालन कृषी सहायक अमित केराम यांनी केले तर आभार कृषी पर्यवेक्षक ए. आर. हुकरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. डी. रहांगडाले, कृषी पर्यवेक्षक जी. एन. जाधवर तसेच कृषी सहायक व तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
बाॅक्स
बचतगटांनी लावले स्टाॅल
रानभाजी महोत्सवात आरमोरी तालुक्यातील विविध बचतगटांनी स्टॉल लावले होते. यामध्ये प्रथम क्रमांक पाथरगोटा येथील बळीराजा शेतकरी बचत गट, द्वितीय पारितोषिक वैरागड येथील संमिश्र महिला बचतगट तर तृतीय पारितोषिक कुकडी येथील काजल महिला बचतगटाने पटकाविला. विविध स्टॉल्सना आरमोरी व परिसरातील नागरिकांनी भेटी देऊन निरीक्षण केले.
130821\1444-img-20210812-wa0084.jpg
आरमोरी येथील रान भाजी महोत्सवात रान भाज्यांची पाहणी करताना आ. कृष्णा गजभे