कृषी सप्ताहनिमित्त विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:27 AM2021-06-01T04:27:45+5:302021-06-01T04:27:45+5:30
येत्या काही दिवसांत खरिपाच्या पेरणीला सुरुवात हाेणार आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम एकाच दिवशी राबविल्यास त्याचा सकारात्मक परिणाम ...
येत्या काही दिवसांत खरिपाच्या पेरणीला सुरुवात हाेणार आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम एकाच दिवशी राबविल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, या उद्देशाने जिल्हाभरात कृषी सप्ताह साजरा करण्याचे नियाेजन कृषी विभागाने केले आहे. १ जूनला सर्व पिकांच्या बियाण्यांची उगवण क्षमतेची चाचणी घेतली जाईल. २ जूनला १० टक्के खत बचतीबाबत मार्गदर्शन केले जाईल. ३ जूनला पेर भात, पट्टा पद्धत, श्री पद्धत, सगुणा पद्धतीने धान लागवडीची माहिती दिली जाईल. ४ जूनला वनस्पतीजन्य कीटकशानक, दशपर्णी अर्काचा वापर, जैविक कीटकनाशक मेटारायझियम यांच्या वापराबाबत मार्गदर्शन केले जाईल. ५ जूनला बीज प्रक्रिया माेहीम राबविली जाईल. या उपक्रमांमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी उपसंचालक अरुण वसवाडे यांनी केले आहे.