स्कूल ऑफ स्काॅलर्समध्ये विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:36 AM2021-03-05T04:36:29+5:302021-03-05T04:36:29+5:30
इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, स्वरचित कविता, इयत्ता पाचवी आणि सहावीसाठी कथाकथन स्पर्धा घेण्यात आली. कथाकथन स्पर्धेत ...
इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, स्वरचित कविता, इयत्ता पाचवी आणि सहावीसाठी कथाकथन स्पर्धा घेण्यात आली. कथाकथन स्पर्धेत इयत्ता पाचवीचा अन्वय चौधरी याने प्रथम क्रमांक, तर राघव हरडे याने दुसरा क्रमांक पटकाविला. इयत्ता सहावीमधून राज खोकले याने प्रथम, तर शरयू करेवार व पलक बोथरा हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. इयत्ता सातवीमधून काव्यलेखन स्पर्धेमध्ये आभा मडावी हिने प्रथम, तर आठवीमधून आयुशी चौधरी हिने प्रथम क्रमांक पटकाविला. इयत्ता नववी ‘अ’ मधून मृणाली कोडापे हिने प्रथम, तर लावण्या चिंचाळकर हिने द्वितीय क्रमांक, तुकडी ‘ब’ मधून आदित्य मोहुर्ले याने प्रथम क्रमांक, दीप्ती नैताम हिने द्वितीय क्रमांक, तुकडी ‘क’ मधून आर्या ठाकरे हिने प्रथम क्रमांक, तर लिखित राखडे याने द्वितीय क्रमांक पटकाविला. निबंध स्पर्धेत तुकडी ‘ब’ मधून गुंजन उपरीकर हिने प्रथम क्रमांक, तर मनस्वी पेंदाम हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. तुकडी ‘क’ मधून वैष्णवी सडमेक हिने प्रथम क्रमांक, तर गौरी वैद्य हिने द्वितीय क्रमांक पटकाविला.