वायसीएम विद्यापीठाचे विविध उपक्रम अनाेखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:38 AM2021-09-11T04:38:03+5:302021-09-11T04:38:03+5:30

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक विभागीय केंद्र, नागपूर गडचिरोली जिल्हा अभ्यास केंद्रप्रमुख संचालक, संयोजक व सहायकांची बैठक श्री. ...

The various activities of YCM University are unique | वायसीएम विद्यापीठाचे विविध उपक्रम अनाेखे

वायसीएम विद्यापीठाचे विविध उपक्रम अनाेखे

Next

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक विभागीय केंद्र, नागपूर गडचिरोली जिल्हा अभ्यास केंद्रप्रमुख संचालक, संयोजक व सहायकांची बैठक श्री. किसनराव खोब्रागडे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आरमोरी येथील सभागृहात गुरुवारी पार पडली. या वेळी जिल्ह्यातील सर्व अभ्यास केंद्रप्रमुख आणि संयोजक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सचिन खोब्रागडे होते. प्रमुख अतिथी म्हणून कक्षाधिकारी भूपेश गुल्हाने, तांत्रिक समन्वयक नीलेश आगळे, प्राचार्य डी. आर. भगत, केंद्र संचालक प्रशांत गणवीर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. सचिन खोब्रागडे, रूपेश गुल्हाने, नीलेश आगळे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. डी. आर. भगत, संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर तर आभार प्रा. एस. पी. खेडेकर यांनी मानले.

100921\img_20210910_142948.jpg

नागपूर विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. नारायण मेहरे

Web Title: The various activities of YCM University are unique

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.