विवेकानंदनगरातील प्रबुद्ध बुद्ध विहारात वर्षावास प्रवचन मालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:35 AM2021-07-29T04:35:50+5:302021-07-29T04:35:50+5:30
बुध्दाचा धम्म हा मानवी कल्याणाचा असून, आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमापर्यंतचा विविध विषयांवर होणाऱ्या प्रवचनांचा लाभ प्रत्येकानी ...
बुध्दाचा धम्म हा मानवी कल्याणाचा असून, आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमापर्यंतचा विविध विषयांवर होणाऱ्या प्रवचनांचा लाभ प्रत्येकानी घ्यावा, असे आवाहन सरचिटणीस तुलाराम राऊत यांनी केले. उपाध्यक्ष लहुजी रामटेके यांनीही मार्गदर्शन केले. भारतीय बौद्ध महासभेचे शहर अध्यक्ष बाळकृष्ण बांबोळे यांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन केले .
प्रास्ताविक कोषाध्यक्ष मोरेश्वर अंबादे, तर संचालन व आभार प्रदर्शन मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र बांबोळे यांनी केले .
यशस्वीतेसाठी मंडळाचे उपाध्यक्ष बारसागडे , कोषाध्यक्ष कोल्हे, सदस्य फूलझेले, रमाई महिला मंडळाच्या वाहाने, बांबोळे यांनी सहकार्य केले.
(बॉक्स)
गौतम बुद्धांच्या काळापासून परंपरा
तथागत भगवान गौतम बुद्धांच्या काळापासून वर्षावासाला प्रारंभ झाला. तथागत गौतम बुद्धांनी इसवी सन पूर्व ५२८ मध्ये सारनाथ याठिकाणी पंचवर्गीय भिक्खूना धम्मासंबंधीचे मार्गदर्शन केले. श्रावस्ती, सारनाथ, वैशाली, राजगृह आदी ठिकाणी इ. स. पूर्व ४८३ पर्यंत वर्षावास करून धम्मा संबंधीचे प्रवचन केले. तेव्हापासून आजतागायत ही वर्षावासाची परंपरा सुरू आहे. पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग तसेच दहा पारमिताचे प्रत्येकांनी आपल्या जीवनात पालन करून बुद्धांचा धम्म आचरणात आणावा, असे प्रा. गौतम डांगे यांनी सांगितले.