भाजीपाला कडाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 10:29 PM2019-05-12T22:29:04+5:302019-05-12T22:29:22+5:30

सध्या लग्न समारंभाचे दिवस आहेत. या कालावधीत पालेभाज्या व फळभाज्यांची मागणी वाढली आहे. वाढत्या तापमानामुळे ग्रामीण भागातून भाजीपाल्याची आवक कमी होत आहे. मागणी व पुरवठ्यामध्ये बराच अंतर पडल्याने भाजीपाल्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

Vegetable crust | भाजीपाला कडाडला

भाजीपाला कडाडला

googlenewsNext
ठळक मुद्देसर्वसामान्यांचे बजेट कोलमडले : वाढत्या तापमानाने आवक कमी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सध्या लग्न समारंभाचे दिवस आहेत. या कालावधीत पालेभाज्या व फळभाज्यांची मागणी वाढली आहे. वाढत्या तापमानामुळे ग्रामीण भागातून भाजीपाल्याची आवक कमी होत आहे. मागणी व पुरवठ्यामध्ये बराच अंतर पडल्याने भाजीपाल्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
गडचिरोली येथील १२ मे रोजी रविवार भरलेल्या आठवडी बाजारात अनेक प्रकारच्या भाज्यांचे दर वाढल्याचे दिसून आले. जिल्हा मुख्यालयातील बाजारपेठेत दर रविवारी तालुक्यासह चामोर्शी, आरमोरी, देसाईगंज, धानोरा यासह अन्य तालुक्यातून भाजीपाल्याची आवक होते. तरीसुद्धा रविवारी भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांनी पालेभाज्या व फळभाज्यांची लागवड केली आहे. अनेक बाजारपेठांमध्ये शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी नेतात. सध्या लग्न समारंभाची धामधूम आहे. भाजीपाल्याची आवक बाजारात बºयापैकी होत असली तरी मागणी अधिक असल्याने बाजारपेठेत वस्तू टिकून राहत नाही. त्यामुळे रविवारच्या बाजारात विविध वस्तूंचे दर वाढल्याचे दिसून आले. अनेक ग्राहकांनी किलो ऐवजी अर्धा किलो वस्तूवरच समाधान मानले.
मेथी, पालक, चवळीमाट व इतर प्रकारच्या भाज्या या बाजारात अत्यल्प प्रमाणात विक्रीसाठी आल्या होत्या. त्यामुळे या पालेभाज्यांचेही दर विक्रेत्यांनी वाढविल्याचे दिसून आले. भाजीपाल्यापेक्षा ग्राहकांचा आंबे खरेदीवर अधिक भर होता.

असे होते गडचिरोलीच्या बाजारात भाजीपाल्याचे दर
आठवडाभरापूर्वी पालेभाज्या व फळभाज्यांचे दर स्थिर होते. परंतु १२ मे रोजी गडचिरोलीच्या आठवडी बाजारात विविध वस्तूंची दरवाढ झाल्याचे दिसून आले. उत्तम दर्जाचे टमाटर ३० रूपये प्रति किलो, बटाटे २० रूपये प्रति किलो, मिरची २० रूपये पाव, कांदे २० रूपये प्रति किलो, कोथिंबीर ३० ते ४० रूपये पाव, कारले १५ ते २० रूपये पाव, भेंडी २० रूपये प्रति किलो, लवकी २० रूपये प्रति नग, फुल कोबी १० रूपये पाव, फणस १० रूपये पाव, लसून ३० ते ४० रूपये पाव याप्रमाणे विकले जात होते. याशिवाय बाजारात आंब्याची अत्यल्प आवक असल्याने ७० ते १०० रूपये प्रति किलो दराने विक्री केली जात होती. या भाववाढीचा आर्थिक फटका ग्राहकांना बसला. सध्या लग्नसमारंभाचे दिवस असल्याने तसेच जिल्ह्यात वादळी पाऊस होत असल्याने भाजीपाल्याच्या आवकीवर परिणाम होत आहे. याचेच कारण म्हणून प्रचंड भाववाढ झाली. त्यामुळे खरेदी-विक्रीवरही परिणाम झाला.

Web Title: Vegetable crust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.