गडचिरोलीत ६.६० लाखांच्या दारूसह वाहन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 11:55 AM2018-03-06T11:55:00+5:302018-03-06T11:55:07+5:30
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मध्यरात्री चोरट्या मार्गाने येत असलेली ६ लाख ६० हजार रु पयांची विदेशी दारू आणि ४ लाख ५५ हजार किमतीचे वाहन असा ११ लाख १५ हजार रु पयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मध्यरात्री चोरट्या मार्गाने येत असलेली ६ लाख ६० हजार रु पयांची विदेशी दारू आणि ४ लाख ५५ हजार किमतीचे वाहन असा ११ लाख १५ हजार रु पयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
गडचिरोलीच्या उपविभागिय अधिकारी कार्यालयाचे पोलीस उपनिरिक्षक नरेंद्र जगदाळे यांना एका वाहनातून दारु साठा येत असल्याची माहिती मिळाल्याने ते खासगी वाहनाने सहकाऱ्यांसह गडचिरोली ते चांदाळा मार्गावर दबा धरून बसले होते. रात्री १.३० वाजताच्या सुमारास पांढऱ्या रंगाचे पीकअप वाहन (सीजे 08, एल ३१७२) येत असताना त्यांनी वाहन थांबवून तपासणी करीत असताना वाहन चालक व त्याच्या सहकाऱ्याने तेथून पळ काढला. त्या वाहनात बॉम्बे स्पेशल असे लेबल असलेल्या दारूच्या १८० मिलीच्या २९०० सिलबंद बाटल्या (किंमत ५ लाख ८० हजार रु पये), रॉयल क्र ाउन व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ४०० सिलबंद बाटल्या (किंमत ८० हजार) अशी ६.६० लाखांची दारू आणि वाहन जप्त केले. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरु द्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम ६५ (अ), ८३, ९८ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एसडीपीओ डॉ.सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.