इंधनानुसार वाहनाला लागणार स्टिकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:33 AM2021-08-01T04:33:52+5:302021-08-01T04:33:52+5:30
स्टिकर कुठे मिळणार? वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्या किंवा विक्री करणाऱ्या डीलरलाच वाहन विक्री करताना सदर अधिसूचनेनुसार स्टिकर लावून द्यावे ...
स्टिकर कुठे मिळणार?
वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्या किंवा विक्री करणाऱ्या डीलरलाच वाहन विक्री करताना सदर अधिसूचनेनुसार स्टिकर लावून द्यावे लागेल. त्याशिवाय आरटीओत नवीन वाहनांची नोंदणी होणार नाही. याबाबत प्रारंभिक अधिसूचना जारी झाली असली तरी अद्याप त्यासंदर्भात अंमलबजावणीचे आदेश नाहीत. सदर आदेश देशात एकाच वेळी लागू हाेणार आहेत.
स्टिकर नाही लावले तर ?
स्टिकर लावल्याशिवाय वाहन विक्री करता येणार नाही. आरटीओत त्याचे रजिस्ट्रेशन होणार नाही. स्टिकर नसल्यास मोटार वाहन कायद्याच्या कलम ३९ नुसार कारवाई केली जाईल असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
------------------------जिल्ह्यातील एकूण वाहने
पेट्रोलवर चालणारी वाहने- ११९५९२
डिझेलवर चालणारी वाहने- ३०६२४
इलेक्ट्रिक वाहने ५४२
---------------------------------कोणत्या वाहनांसाठी कुठल्या रंगाचे स्टिकर
पेट्रोल व सीएनजी वाहनाकरिता फिकट निळा,
इलेक्ट्रिक हायब्रिड वाहनाकरिता हिरवे,
तर डिझेल वाहनांकरिता नारंगी रंगाचे स्टिकर
-------------------------