घटनास्थळावरून वाहन हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2017 01:18 AM2017-05-07T01:18:10+5:302017-05-07T01:18:10+5:30
तालुक्यातील कारमपल्ली - टेकला रस्त्यावर ३ मे रोजी सी-६० जवानांचे बुलेटप्रुफ वाहन भूसुरूंग लावून नक्षल्यांनी उडविले होते.
भामरागडात आणले : भूसुरूंग स्फोटात क्षतिग्रस्त झालेले वाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : तालुक्यातील कारमपल्ली - टेकला रस्त्यावर ३ मे रोजी सी-६० जवानांचे बुलेटप्रुफ वाहन भूसुरूंग लावून नक्षल्यांनी उडविले होते. घटनेनंतर दोन दिवस भूसुरूंगरोधक वाहन घटनास्थळावरच पडून होते. शुक्रवारी सदर वाहन भामरागड येथे हलविण्यात आले.
क्रेनच्या सहाय्याने क्षतिग्रस्त वाहन भामरागड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. वाहन पोलीस स्टेशनमध्ये आणताच वाहन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. सदर वाहन अहेरी प्राणहिता पोलीस मुख्यालयात नेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळावर भूसुरूंग स्फोटामुळे तब्बल १० फूट खोल खड्डा पडला. वाहन हवेत २० फूट उंचावर फेकल्या गेले व खाली कोसळले. यामध्ये वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.