पहिल्याच दिवशी मार्कंडात उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:19 PM2019-03-04T22:19:52+5:302019-03-04T22:20:24+5:30

शिवरात्रीनिमित्त चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे १० दिवसांची जत्रा भरत आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी मार्र्कंडादेव येथे मोठी गर्दी उसळली. मार्र्कंडादेव येथील रस्ते यात्रेकरूंनी भरून गेले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक वैनगंगा नदीतून येतात. त्यामुळे नदीतही जत्रेचे स्वरूप बघायला मिळत होते.

On the very first day mark | पहिल्याच दिवशी मार्कंडात उसळली गर्दी

पहिल्याच दिवशी मार्कंडात उसळली गर्दी

Next
ठळक मुद्दे‘हर हर महादेव’चा गजर : अर्धा किमी अंतरावरच थांबविली जात होती वाहने, १० दिवस चालणार जत्रा

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी/मार्र्कंडादेव : शिवरात्रीनिमित्त चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे १० दिवसांची जत्रा भरत आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी मार्र्कंडादेव येथे मोठी गर्दी उसळली. मार्र्कंडादेव येथील रस्ते यात्रेकरूंनी भरून गेले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक वैनगंगा नदीतून येतात. त्यामुळे नदीतही जत्रेचे स्वरूप बघायला मिळत होते.
मार्र्कंडादेव येथे हेमाडपंथी अतिशय प्राचिन मंदिर आहे. मार्र्कंडेश्वराचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांबरोबरच पर्यटकही वर्षभर मार्र्कंडादेव येथे भेट देत राहतात. महाशिवरात्रीनिमित्त गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी जत्रा भरतात. मात्र मार्र्कंडा येथील जत्रा सर्वात मोठी जत्रा आहे.
या जत्रेला चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा, तेलंगणा व छत्तीसगड राज्यातील लाखो भाविक येतात. महाशिवरात्रीपासून पुढील पाच दिवस या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी उसळते. मार्र्कंडेश्वराची जत्रा जवळपास दीड किमी अंतरावर पसरली राहते. अनेक नागरिक चारचाकी व दुचाकी वाहनांनी येतात. वाहनांची गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी चारचाकी व दुचाकी वाहनांच्या पार्र्किंगची व्यवस्था मार्र्कंडापासून अर्धा किमी अंतरावर करण्यात आली आहे. यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी मनोरंजनाची विविध साधने आली आहेत. मनोरंजनाच्या साधनांजवळच मोठी गर्दी दिसून येत होती. स्वच्छता, पाणी व्यवस्था, वाहतूक व्यवस्था निट राहिल, यासाठी प्रशासनाने पूर्व नियोजन केले असल्याने पहिल्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

महाशिवरात्रीनिमित्त सोमवारी भामरागडनजीकच्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानासाठी परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. स्नानानंतर भाविकांनी महादेवाची पूजा-अर्चा केली.
पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती या नद्यांचा त्रिवेणी संगम भामरागडनजीक आहे. भामरागडनजीकच्या त्रिवेणी संगमाजवळ कोणतेही देवस्थान नाही. परंतु तालुक्यातील ८८ टक्के लोक या संगमावर येऊन महाशिवरात्रीच्या काळात पवित्र स्नान करून मनोभावे पूजाअर्चा करतात. सोमवारी या संगमावर खुप दूरवरून शेकडो भाविक आले होते. येथे पूजा-अर्चा केल्यानंतर जंगलात वनभोजनाचा आस्वाद घेतला. येथील समुह निवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनीही सुटीवर न जाता सदर त्रिवेणी संगमावर सहल आणून पवित्र स्नानाचा आस्वाद घेतला. सदर त्रिवेणी संगमावर आणखी तीन ते चार दिवस भक्तांची आंघोळीसाठी गर्दी होणार आहे.

लोकप्रतिनिधींच्या हस्ते पार पडली महापूजा
महाशिवरात्रीनिमित्त पहाटे ४ वाजेपासून शिवपिंडीची महापूजा करण्यात आली. मार्र्कंडेश्वर मंदिराच्या मुख्य गाभाºयात अभिषेक करण्यात आला. महापुजेचे मानकरी होण्याचा मान खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, बिनाराणी होळी दाम्पत्य, जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, मधुकर भांडेकर दाम्पत्य, पुजारी पंकज पांडे, शुभांगी पांडे दाम्पत्य, पराग आर्इंचवार, अमृता आर्इंचवार दाम्पत्य, पं.स. सभापती आनंद भांडेकर, वर्षा भांडेकर दाम्पत्य यांना देण्यात आला. यावेळी डॉ. भारत खटी, प्र.सो. गुंडावार, तहसीलदार अरूण येरचे, यांच्या पत्नी मंदाताई येरचे, संजय वडेट्टीवार, नेहा वडेट्टीवार, मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड, मंगला भांडेकर, वैशाली भांडेकर, अमोल येगीनवार, दिवाकर नैताम, दिलीप चलाख, जयराम चलाख, उज्वल गायकवाड, पुजारी श्रीकांत पांडे, नाना आमगावकर, रामू गायकवाड, जि.प. सदस्य विद्या आभारे, रिकू पालारपवार आदी उपस्थित होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही सकाळच्या सुमारास मार्र्कंडादेव येथे येऊन मार्र्कंडेश्वराचे दर्शन घेतले.

गोत्र पूजाही पार पडली
पहाटे ४ ते ६ वाजेपर्यंत महापूजा पार पडली. दर्शनाच्या रांगेत असलेले पहिले वारकरी मार्र्कंडादेव येथील जितेंद्र कोवे यांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने स्वागत करण्यात आला. सकाळी ६ वाजेपासून मार्र्कंडेश्वराचे दर्शन भाविकांसाठी सुरू करण्यात आले. पहिल्याच दिवशी लाखोंच्या संख्येने भाविक मार्र्कंडादेव येथे दाखल होऊन मार्र्कंडेश्वराचे दर्शन घेतले. मार्र्कंडेश्वराचे दर्शन घेण्यासाठी मोठी रांग लागली होती. आदिवासी बांधवांनी आदिवासी संस्कृतीनुसार गोत्र पूजा केली. सोमवारी रात्री आदिवासी बांधव एकत्र येऊन शंभू जागरण करणार आहेत. ढोलताशांच्या गजराने मार्र्कंडेश्वराची पूजा केली.

Web Title: On the very first day mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.