पुढील दोन आठवडे अतिशय महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 05:00 AM2020-04-13T05:00:00+5:302020-04-13T05:00:34+5:30

संचारबंदीची योग्य अंमलबजावणी झाल्यास कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाला योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील. यामध्ये संसर्ग टाळण्यासाठी विलगीकरण करणे, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक व पुरवठा करणे, गरजूंपर्यंत मदत पोहोचविणे या कामांना गती देता येईल. जिल्हा कोरोना संसर्गमुक्त ठेवण्यासाठी लॉकडाऊन संचारबंदी आवश्यक आहे. त्यातून सूट देणे म्हणजे, संसर्गाला आमंत्रण दिल्यासारखे आहे.

Very important in the next two weeks | पुढील दोन आठवडे अतिशय महत्त्वाचे

पुढील दोन आठवडे अतिशय महत्त्वाचे

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी संचारबंदीचे पालन करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : संचारबंदीची यशस्वी अंमलबजावणी झाल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात सद्य:स्थितीत एकही कोरोनाबाधीत रूग्ण नाही. नागरिकांनी अजून काही दिवस संयम बाळगावा. दुसºया जिल्ह्यातून आलेले अजुनही १ हजार ५९२ नागरिक आरोग्य विभागाच्या निगराणीखाली आहेत. पुढील दोन आठवडे अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी संचारबंदीचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.
संचारबंदीची योग्य अंमलबजावणी झाल्यास कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाला योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील. यामध्ये संसर्ग टाळण्यासाठी विलगीकरण करणे, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक व पुरवठा करणे, गरजूंपर्यंत मदत पोहोचविणे या कामांना गती देता येईल. जिल्हा कोरोना संसर्गमुक्त ठेवण्यासाठी लॉकडाऊन संचारबंदी आवश्यक आहे. त्यातून सूट देणे म्हणजे, संसर्गाला आमंत्रण दिल्यासारखे आहे. जीवनावश्यक वस्तू व शेतीविषयक दुकानांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. मात्र याचा दुरूपयोग होता कामा नये. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडणार नाही. लहानसहान कामासाठी अनावश्यक काही नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यांनी संयम बाळगावा. दोन आठवडे घराबाहेर पडू नये.
एकूण १७ हजार १०३ नागरिक दुसºया जिल्ह्यातून आले होते. त्यापैकी १ हजार ५९२ नागरिकांचा क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण झालेला नाही. त्यांच्यावर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत ४५ नागरिकांचे नमुने तपासले आहेत. त्यातील ४१ नमुने निगेटीव्ह आले आहेत. दोन नमुन्यांचा अहवाल मिळणे बाकी आहे. अजुनही धोका संपला नाही. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. कोरोनामुक्त नऊ जिल्ह्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे. कोरोनाविरोधात लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. संचारबंदीचे पालन जेवढे चांगल्या पध्दतीने होईल, तेवढेच लवकरच लॉकडाऊन हटविण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी संचारबंदीचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.

कर्मचाऱ्यांच्या अपडाऊनवर प्रतिबंध घाला
गडचिरोली जिल्ह्यात सद्य:स्थितीत एकही कोरोनाग्रस्त नाही. भविष्यात बाहेर जिल्ह्यातून येणाºया नागरिकांमुळे संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली काही कर्मचारी दुसºया जिल्ह्यातून ये-जा करतात. या कर्मचाºयांमुळे धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येक कर्मचाºयाने मुख्यालयी राहणे सक्तीचे आहे. तरीही काही कर्मचारी ये-जा करतात. अशा कर्मचाºयांवर जिल्हा सीमेवर तैनात असलेल्या पोलिसांनी प्रतिबंध घालावा. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

इंदिरा गांधी चौकात तैनात पोलीस प्रत्येक वाहनधारकाची नोंद करीत आहेत. त्यामध्ये वाहनधारकाचे नाव, वाहन क्रमांक, मोबाईल क्रमांक, कुठून कुठे चालले, याची नोंद घेतली जात आहे. या नोंदीवरून एखादा नागरिक दिवसातून कितीवेळा फिरला हे पोलिसांच्या लक्षात येणार आहे.

आतील गल्ल्यांमधून वाहनांची वर्दळ
किराणा दुकान, भाजीपाला खरेदीची कारणे सांगून काही नागरिक घराबाहेर पडत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी १ वाजतानंतर सर्वच दुकाने बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे घराबाहेर पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरीही काही नागरिक दुचाकी धरून फिरत राहतात. मुख्य मार्ग व इंदिरा गांधी चौकात पोलीस राहतात. त्यामुळे सदर वाहनधारक शहरातील आतमधल्या गल्ल्यांमधून भरधाव वाहने चालवतात. पोलिसांच्या फिरत्या पथकाने शहरातील आतमधल्या गल्ल्यांमधूनही फेरफटका मारण्याची गरज आहे.

Web Title: Very important in the next two weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.