तालुक्यातील दाेनही पशुवैद्यकीय दवाखाने जीर्णावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:45 AM2021-06-09T04:45:07+5:302021-06-09T04:45:07+5:30
दवाखान्याच्या इमारतीवरील आडे, वासे, फाटे व कवेलूंची मोडतोड झालेली आहे. परिणामी त्या पशुवैद्यकीय दवाखान्यात एखाद्या वेळेस अपघात होण्याची शक्यता ...
दवाखान्याच्या इमारतीवरील आडे, वासे, फाटे व कवेलूंची मोडतोड झालेली आहे. परिणामी त्या पशुवैद्यकीय दवाखान्यात एखाद्या वेळेस अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या दोन्ही ठिकाणातील पशुवैद्यकीय दवाखान्याचे नव्याने बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी या परिसरातील पशुपालकांनी केली आहे.
तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात गाय वर्ग पशुधन ६७ हजार ७५१, म्हैस वर्ग ७ हजार ६९५, शेळी वर्ग २२४०६, मेंढी वर्ग ३५०३ पशुधन आहे. चामोर्शी तालुक्यातील चौडमपल्ली, आष्टी, कोनसरी, मुधोली, अड्याळ, लखमापूर बोरी, मुरखळा, भेंडाळा, घोट, कुनघाडा रै, मुरमुरी, रेगडी, चापलवाडा, तुंबडी, आमगाव, भाडभिडी या १६ पशुवैद्यकीय दवाखान्यात शौचालय व दवाखान्यात पाणी वापरण्यासाठी टाकीची व पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे या पशुवैद्यकीय दवाखान्यात जिल्हा परिषद गडचिरोली प्रशासनाने शासन स्तरावरुन शौचालय व पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे