विदर्भवाद्यांनी दिले धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:36 AM2021-02-16T04:36:53+5:302021-02-16T04:36:53+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : काेराेनाकाळातील वीजबिलातून जनतेची मुक्तता करावी, यासह विविध मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदाेलन समितीच्या वतीने गडचिराेली ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनाकाळातील वीजबिलातून जनतेची मुक्तता करावी, यासह विविध मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदाेलन समितीच्या वतीने गडचिराेली येथील इंदिरा गांधी चाैकात साेमवारी धरणे आंदाेलन करण्यात आले.
यावेळी समितीचे जिल्हा समन्वयक अरुण मुनघाटे, नारायण मस्के, गुरूदेव भाेपये, रमेश भुरसे, विलास निंबाेरकर, जनार्धन साखरे, प्रतिभा चाैधरी, दिवाकर पिपरे, अमिता मडावी, पूजा निंबाेरकर, एजाज शेख, याेगेंद्र नांदगावे आदीसह विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित हाेते.
जनतेला २०० युनिटपर्यंत वीजबिल माफ करावे व त्यानंतरचे वीजबिल निम्मे करावे. शेतीपंपाच्या वीज बिलातून शेतकऱ्यांना मुक्त करावे. कृषिपंपाचे भारनियमन बंद करावे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसानभरपाई म्हणून प्रतिहेक्टर २५ हजार रुपये इतकी आर्थिक मदत द्यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.
गडचिराेलीच्या तहसीलदारांमार्फत मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे पाठविण्यात आले.