विदर्भ बंदला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:39 PM2017-12-11T23:39:07+5:302017-12-11T23:40:35+5:30

स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी ११ डिसेंबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने जिल्ह्यात बंदचे आवाहन केले होते.

Vidarbha Bandala composite response | विदर्भ बंदला संमिश्र प्रतिसाद

विदर्भ बंदला संमिश्र प्रतिसाद

Next
ठळक मुद्देगडचिरोली शहरातील अर्धी बाजारपेठ सुरू : ११ तालुकास्तरावर पाळला कडकडीत बंद

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी ११ डिसेंबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने जिल्ह्यात बंदचे आवाहन केले होते. या बंदला जिल्हाभरात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
गडचिरोली : गडचिरोली शहरातील शाळा, महाविद्यालये बऱ्याच प्रमाणात बंद होते. बसस्थानकाकडून गांधी चौकापर्यंतची दुकाने बंद ठेवण्यात आली. गांधी चौकातील काही दुकानदारांनी मात्र बंदवर आक्षेप घेतला. व्यापाऱ्यांची केंद्रीय संघटना आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आपल्याला दुकाने बंद ठेवण्याबाबत निर्देश नाही. त्यामुळे दुकाने बंद ठेवली जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे इंदिरा गांधी चौक, चामोर्शी मार्ग, मूल मार्ग, मुख्य बाजारपेठेतील दुकाने दिवसभर सुरू होती. या आंदोलनात समितीचे जिल्हा समन्वयक अरूण मुनघाटे, चंद्रशेखर भडांगे, रवींद्र वासेकर, पांडुरंग घोटेकर, अमिता मडावी, एजाज शेख, बाळू मडावी, रजनिकांत मोटघरे, संतोष बोलुवार, गुरूदेव भोपये, रूचित वांढरे, प्रभाकर बारापात्रे, डी. एन. बर्लावार, रमेश भुरसे, विवेक चडगुलवार, जनार्दन साखरे आदी सहभागी झाले.
चामोर्शी : चामोर्शी येथील मुख्य बसस्थानक परिसरात टायर जाळून काही काळ चक्काजाम आंदोलन करण्यात आले. चामोर्शी येथील संपूर्ण बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये, व्यापारी प्रतिष्ठाणे, हॉटेल, चहाच्या टपºया निमशासकीय कार्यालय बंद ठेवण्यात आले होते. या आंदोलनाला फुटपाथ असोसिएशन किराणा व्यापारी संघ तालुका काँग्रेस कमिटी, स्वाभिमानी संघटना यांनी समर्थन दर्शविले. चामोर्शी येथील बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद होती. बंद यशस्वी करण्यासाठी तालुका काँग्रेस अध्यक्ष निशांत नैताम, विदर्भ संघटनेचे शहर अध्यक्ष कृष्णा नैताम, सामाजिक कार्यकर्ते माणिकराव तुरे, नगरसेवक सुमेध तुरे, कालिदास बुरांडे, सुनिल जुवारे, स्वाभिमानी संघटनेचे संतोष बुरांडे, रोशन चलाख, साईनाथ गव्हारे, राजू धोडरे, प्रकाश सहारे, राजू किरमे, गोकुल वासेकर, कुणबी संघटनेचे अध्यक्ष बाळूजी दहेलकर, एस. के. डंबारे, धनराज वासेकर, दीपक नैताम, सुरेश नैताम, सारीख शेख, दिलीप सैनी, राजू तायडे, गुलचंद कामिडवार, फरहाण खान, साईद शेख, नितेश साखरे, सलमान शेख, निशान यापकवार यांच्यासह शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
चामोर्शी तालुक्यातील येनापूर येथील शाळा, महाविद्यालये व बाजारपेठ बंद होती. आंदोलन यशस्वी करण्यासाठी मनमोहन बंडावार, निलकंठ निखाडे, माजी जि.प. सदस्य राजू आत्राम, बाळू निखाडे, विकास राऊत, निशिकांत खिरटकर, दीपक पुच्छलवार, फूलचंद उंदीरवाडे, अखिल रामटेके, अविनाश दुधे, मिथून गेडाम, राजू संपतवार, धनराज बोमकंटीवार, प्रांजल बोडावार, रूपेश गर्गम, निकेश पत्तीवार, प्रकाश बोडावार यांनी सहकार्य केले. अर्धा तास चक्काजाम आंदोलनही करण्यात आले.
वैरागड : वैरागडसह परिसरातील मानापूर, देलनवाडी येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कढोली येथे दर सोमवारी बाजार भरते. सदर बाजार सुध्दा बंद होते. देलनवाडी येथील धान खरेदी केंद्र, परिसरातील शाळा महाविद्यालये व बाजारपेठ बंद होती.
आरमोरी : विदर्भ बंदच्या आंदोलनाला आरमोरी येथे चांगला प्रतिसाद मिळाला. आरमोरी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शालिक नाकाडे यांच्या नेतृत्वात शेकडो विदर्भवादी कार्यकर्त्यांनी सोमवारी आरमोरी-वडसा टी-पार्इंटवर आंदोलन केले. यामुळे वडसा-नागपूर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. दिवसभर बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. बंद यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य मनीषा दोनाडकर डॉ. संगीता रैवतकर, छगन हेडाऊ, विठ्ठल हिरापुरे, नरेंद्र तिजारे, वामन जुआरे, सुनील नंदनवार, ताराचंद नागदेवे, हंसराज बडोले, भीमराव ढवळे, श्रीराम कार, ऋषी पांडे, डाकराम चुट्टे, राजू धार्मिक, भास्कर खोब्रागडे, गंगाधर कोहाडे, प्रवीण रहाटे, शंकर राऊत, बबन माकडे, आनंदराव दोनाडकर, पुंडलिक चंद्रगिरे आदी अनेकांनी सहकार्य केले.
कुरखेडा : कुरखेडा-देसाईगंज मार्गावर दोन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शाळा, महाविद्यालये, खासगी प्रवासी वाहतूक दिवसभर बंद ठेवण्यात आली. बंद व चक्काजाम आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे तालुका संयोजक गणपत सोनकुसरे, जिल्हा उपाध्यक्ष घिसू खुणे, तालुका सचिव मुक्ताजी दुर्गे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक इंदुरकर, नगरसेविका अनिता बोरकर, वामदेव सोनकुसरे, श्रीहरी किरंगे, शमीम शेख, संतोष जनबंधू, रमेश मानकर, ओ.पी. चव्हाण, राजेश उईके, तिलक नैताम, नरेश नाकाडे, यादव सहारे, उत्तम शेंडे, जगन मडावी, कवाडकर, प्रमोद खुणे, शांताबाई खुणे, संपत कुमरे, माया भैैसारे, सुनीता फुलबांधे, माया मुंगमोडे, प्रेमिला चौधरी, भारती जुडा, कलेसिया केवास, ललीता कपूर, पंचकुवर जुडा, भारती नरोटे, रेखा हलामी, उर्मिला सहाळा, सुंदरा नैताम, देवबत्ती सहाळा, परसराम मडावी यांनी सहकार्य केले. तालुक्यातील गेवर्धा येथे सर्व दुकाने, शाळा, विद्यालये बंद ठेऊन विदर्भ राज्य आंदोलन समितीला पाठींबा जाहीर केला. या प्रसंगी ग्रा. पं. सदस्य रोशन सय्यद, निजाम शेख, मडावी, जावेद शेख, दिलीप कांबळे, भोला पठाण, डॉ. नासिर खान, विनायक कुथे, सुरेश पुसाम, मुज्जू पठाण, नावेद शेख, अरुण डोंगरवार, यशवंत दाणे, राजू पठाण व गावकरी उपस्थित होते.
पुराडा : पुराडा येथे चक्काजाम आंदोलन करून बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर, चिंतामन सहारे, रामचंद्र रोकडे, सुखदेव तुलावी, उपसरपंच अशोक उसेंडी, सेवकराम ठेला, शिवा डोंगरवार, डॉ. गहाणे, पी. सी. सोनागार, ज्ञानदेव सहारे, केशव सहारे यांनी सहकार्य केले. कुरखेडा-कोरची मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली.
देसाईगंज : विदर्भ बंदला वडसा तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला तालुक्यात ग्रामीण भागात कडकडीत बंद ठेवण्यात आला तर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. वडसा येथे अनेक विदर्भवादी रास्तारोको करण्यासाठी वडसा येथील कुरखेडा रोडवर रेल्वे बोगदा जवळ मार्ग एक तास रस्ता अडविण्यात आला शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली विद्यार्थी, शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. विदर्भवाद्यांनी जोरजोराने घोषणाबाजी केली. या आंदोलनाचे नेतृत्व गौरव नागपूरकर, विलास बन्सोड, कमलेश बारस्कर, राकेश पुरणवार, लीलाधर भरें, जगदीश बद्रे यांनी केले.
आष्टी : आष्टी येथील बाजारपेठ बंद ठेवून वेगळ्या विदर्भाला पाठिंबा दर्शविण्यात आला. आंदोलन यशस्वी करण्यासाठी संजय पंदिलवार, श्यामराव वनकर, शंकर मारशेट्टीवार, विजय खरडीवार, विजय पांडे, मल्लानी जन्नावार, प्रशांत शिरपुरवार, अनिल बोमकंटीवार, दीपक ठाकूर, विशाल बावणे, रवींद्र बोरकुटे, सचिन कलमुलवार, नितेश बोरकुटे, रामा तोडसाम, काशिनाथ गलबले, कमलाबाई बावनथडे, देवा बोरकुटे, मनोहर खोब्रागडे, प्रकाश कुकुडकर, दिलीप डोर्लीकर, भारतसिंह ठाकूर यांनी सहकार्य केले.
अहेरी : आज विदर्भ बंदची घोषणा करीत विदर्भवादी संघटना सहभागी झालेले आहे. वेगळ्या विदर्भ राज्यासाठी लढा देणाऱ्या विदर्भ राज्यच्या मागणीसाठी अहेरी जिल्हा कृती समितीकडून आज अहेरी येथील मुख्य विश्वेश्ववरराव महाराज (गांधी चौक) येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यात शेतकरी, युवक, कामगार, व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले. बेरोजगारांना रोजगार, विदर्भातील रखडलेल्या औद्योगिकरण, वीजदरात वाढ, ग्रामीण भागातील भारनियम आदी प्रश्न गंभीर बनले आहे. वेगळा विदर्भ राज्य हेच या सर्व समस्यावरील उपाय आहे. अहेरी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले, चक्का जाम आंदोलन सुध्दा करण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे, विलास रापर्तीवार, रवी भांदक्कर, प्रशांत जोशी, श्रीनिवास भंडारी, विलास दहागावकर, कवीश्वर गोवर्धन, पंकज शुद्धलवार, प्रदीप देशपांडे, अभय बोंकटीवार, पर्वता मडावी, वंदना सडमेक, विमल पमडवी, यशोदा गुरनुले आदी उपस्थित होते. हे आंदोलन शांतपणे निपटारा व्हावे म्हणून एसडीपीओ गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुरेश मदने यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त होता.

Web Title: Vidarbha Bandala composite response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.