विधानभवनावर धडकणार ‘विदर्भ मार्च’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:21 AM2018-03-16T00:21:40+5:302018-03-16T00:21:40+5:30

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून विविध प्रकारचे आंदोलने करण्यात आली. मात्र सत्ताधारी नेत्यांना स्वतंत्र विदर्भ राज्य देता आले नाही.

Vidarbha March to hit the Legislative Assembly | विधानभवनावर धडकणार ‘विदर्भ मार्च’

विधानभवनावर धडकणार ‘विदर्भ मार्च’

Next
ठळक मुद्देविदर्भाचा झेंडा लावणार : गडचिरोलीतून एक हजार विदर्भवाद्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून विविध प्रकारचे आंदोलने करण्यात आली. मात्र सत्ताधारी नेत्यांना स्वतंत्र विदर्भ राज्य देता आले नाही. विदर्भावर सातत्याने अन्याय होत आहे. त्यामुळे १ मे रोजी महाराष्टÑ दिनी विदर्भवादी कार्यकर्ते विदर्भ मार्चच्या माध्यमातून नागपुरात पोहोचून विधानभवनावर विदर्भाचा झेंडा लावणार आहे, अशी माहिती समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.
१६ व १७ एप्रिल रोजी नागपूर येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला विदर्भवादी नेते उपस्थित राहणार आहेत. विद्यमान भाजप सरकार शेतकरी, शेतमजूर, कामगार व बेरोजगारांच्या हिताचे निर्णय घेण्यास उदासीन आहे. उद्योगपतींसाठी अनुकूल धोरण सरकारच्या वतीने राबविले जात आहे. त्यामुळे विदर्भातील लोकांचा विकास खुंटला आहे, असे राम नेवले यांनी सांगितले. विदर्भवादी पदाधिकारी कार्यकर्ते १ मे रोजी महाराष्ट्र दिवसाचा नागपुरात निषेध करणार आहेत. या आंदोलनाच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यता बैठका सुरू आहे, असे नेवले यांनी सांगितले.
पत्रपरिषदेला विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पश्चिम विदर्भ महिला आघाडीच्या अध्यक्ष रंजना मामर्डे, गडचिरोली जिल्हा समन्वयक अरूण मुनघाटे, प्रतिभा चौधरी, पांडुरंग घोटेकर, रमेश उप्पलवार आदी उपस्थित होते.

Web Title: Vidarbha March to hit the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.