VIDEO: आदिवासींनो, नक्षलवर भरोसा नाय का...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 04:51 PM2017-07-29T16:51:50+5:302017-07-29T16:56:20+5:30

गडचिरोली, दि. 29 - सध्या प्रत्येकाच्या मोबाईलवर फिरत असलेले ‘..भरोसा नाय का?’ हे गाणे चांगलेच हिट झाले आहे. मूळ ...

video-adaivaasainnao-nakasalavara-bharaosaa-naaya-kaa | VIDEO: आदिवासींनो, नक्षलवर भरोसा नाय का...

VIDEO: आदिवासींनो, नक्षलवर भरोसा नाय का...

googlenewsNext

गडचिरोली, दि. 29 - सध्या प्रत्येकाच्या मोबाईलवर फिरत असलेले ‘..भरोसा नाय का?’ हे गाणे चांगलेच हिट झाले आहे. मूळ गाण्याची चाल आणि ठेका कायम ठेवत त्यात राजकारणापासून ते सामाजिक समस्यांवर विडंबन केले जात आहे. नक्षलवादाने होरपळून निघत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही या गाण्याचा उपयोग नक्षलवाद्यांविरूद्ध आदिवासी लोकांना जागरूक करण्यासाठी केला जात आहे. विशेष म्हणजे युवा वर्गात त्याचा सकारात्मक परिणामही दिसून येत आहे.

‘आदिवासींनो, तुमचा नक्षलवर भरोसा नाय का?’ या धृवपदासह नक्षलवाद आदिवासींच्या विकासात कसा बाधक ठरत आहे, त्यांच्यामुळे शैक्षणिक व भौतिक सुविधांमध्ये कशा बाधा येतात, पोलीस दल आदिवासींसाठी कसे मित्र आणि हितचिंतक आहेत हे या गाण्यातून पटवून देण्यात आले आहे. नक्षल कारवायांच्या बाबतीत अतिसंवेदनशील असलेल्या भामरागड तालुक्यातील नारगुंडा सशस्त्र पोलीस चौकीत तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक संदीप मिश्र व त्यांच्या सहकारी कर्मचा:यांनी या गाण्याची शब्दरचना केली आहे. एवढेच नाही तर ते गाणो ‘..भरोसा नाय का?’ या जिकडे-तिकडे व्हायरल होत असलेल्या गाण्याच्या स्टाईलने गाऊन नक्षलग्रस्त नागरिकांना विचार करण्यास भाग पाडत आहे.

28 जुलै ते 3 ऑगस्टदरम्यान नक्षलवाद्यांकडून सर्वत्र शहीद सप्ताह पाळला जात आहे. यादरम्यान नागरिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन नक्षलवाद्यांकडून केले जाते. मात्र ऐन शेतीच्या कामाच्या दिवसात आठवडाभर सर्व व्यवहार बंद ठेवणो परवडणारे नसते. इतरही विकासात्मक कामांना नक्षलवाद्यांमुळे अडथळे येतात. पोलिसांनी तयार केलेल्या या गाण्यामुळे आदिवासी समाजातील युवा वर्गासह सर्वामध्येच जागृती येत आहे. नक्षल सप्ताहादरम्यान नागरिकांनी दहशतीत न वावरता सर्व व्यवहार सुरू ठेवावे म्हणून पोलीस ठिकठिकाणी शांती मार्च काढून त्यांच्यासमोर हे गाणेही सादर करीत आहे.

पोलिसांच्या जनजागृतीचा परिणाम म्हणून यावर्षी अनेक ठिकाणी नागरिकांकडून नक्षलवाद्यांना पाहीजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. नक्षल्यांनी लावलेले बॅनर जाळण्यापासून तर त्यांच्या आवाहनाला विरोध दर्शविणारे दुसरे बॅनर लावण्यार्पयतच्या घटना अनेक ठिकाणी झाल्या आहेत. 

एवढेच नाही तर पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही गावातील लोकांनी त्यांच्याकडील भरमार बंदुका पोलिसांकडे सुपूर्द करून विकास कामांना विरोध करणा:या नक्षलवादाला खतपाणी घालणार नाही, असा निर्धार व्यक्त केला आहे.

{{{{dailymotion_video_id####x8459f3}}}}

Web Title: video-adaivaasainnao-nakasalavara-bharaosaa-naaya-kaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.