VIDEO : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात मतदानाचा उत्साह
By Admin | Published: February 16, 2017 12:45 PM2017-02-16T12:45:19+5:302017-02-16T13:54:04+5:30
ऑनलाइन लोकमत गडचिरोली, दि. 16 - नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या आठ तालुक्यात ३५ जिल्हा परिषद क्षेत्र व ७० पंचायत समिती ...
ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. 16 - नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या आठ तालुक्यात ३५ जिल्हा परिषद क्षेत्र व ७० पंचायत समिती गणात गुरूवारी सकाळी ९.३० वाजेपर्यंत १२.२३ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. अतिशय संवेदनशील भाग असलेल्या कोरची तालुक्यात दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समितीच्या जागांसाठी मतदान होत आहे. अतिशय कडक सुरक्षा व्यवस्थेत येथे सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली असून मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत आहे.
देसाईगंज तालुक्यात सकाळी ९.३० वाजेपर्यंत १४.७१ टक्के मतदान झाले. तर कुरखेडा तालुक्याच्या पुराडा व हेटीनगर भागात २५ टक्के मतदान झाले आहे. मुलचेरा तालुक्यात तिन्ही जिल्हा परिषद क्षेत्र मिळून ९.३० वाजेपर्यंत १०.३५ टक्के मतदान झाले आहे. धानोरा तालुक्यात ११.७० टक्के, गडचिरोली तालुक्यात १३.४६ टक्के, आरमोरी तालुक्यात १२ टक्के तर कोरची तालुक्यात १६.४३ टक्के मतदान सकाळी ९.३० वाजेपर्यंत झाले आहे. कोरची, धानोरा, कुरखेडा आदी संवेदनशील तालुक्यात मोठा पोलीस बंदोबस्त मतदान केंद्रांवर लावण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदान होणार आहे. कुरखेडा तालुक्याच्या दवंडी मतदान केंद्रांवर अनेक मतदार एकच मतदान करून बाहेर निघत होते. त्यानंतर त्यांना पुन्हा परत बोलावून दुसरे मत टाकण्यास सांगण्यात आले. ब-याच मतदारांना जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी दोनदा मतदान करायचे आहे, याची माहिती नसल्याने हा प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गडचिरोली तालुक्यात नवेगाव येथील मतदान केंद्र अधिका-यांकडे असलेल्या यादीमध्ये अनेक मतदारांची नावेच नव्हती. त्यामुळे मतदारांना मतदान करण्यास मज्जाव करण्यात आला. याबाबतची माहिती तहसीलदार संतोष खांडरे यांना सुद्धा देण्यात आली. मतदार यादीत स्वत:चे नाव व क्रमांक शोधण्यासाठी मतदारांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती.
गडचिरोली
9.30 ते 11.30 पर्यंतच्या दोन तासात झालेल्या मतदानाची टक्केवारी
देसाईगंज- 38.02 टक्के
मुलचेरा- 22.46 टक्के
कोरची- 36.71 टक्के
धानोरा- 37.31 टक्के
आरमोरी- 41.39 टक्के
कुरखेडा- 45.09 टक्के
गडचिरोली- 32.19 टक्के
चामोर्शी- 22.17 टक्के
आरमोली तालुका
आरमोरी तालुक्यातील अरसोडा मतदान केंद्रावर 100 शंभर वर्षाहून अधिक वय असलेल्या आजींनी मतदानाचा हक्क बजावला.
https://www.dailymotion.com/video/x844r6s