पुतळा बनून स्वागतासाठी उभा राहतो विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:12 AM2019-06-02T00:12:54+5:302019-06-02T00:13:23+5:30

एक तरी कला असावी अंगी, असे म्हटले जाते. प्राचीन काळापासून कला हे मानवी जीवनाचे अंग बनले आहे. एखादा जिवंत व्यक्ती डोळ्याची पापणी न हलवता, गुदगुल्या लावल्यानंतरही हालचाल न करता पुतळ्याप्रमाणे दोन तास स्थिर राहत असेल तर ती एक कलाच आहे. अशी कला सुध्दा मानवाला आकर्षित करु शकते.

Vijay stands up for the statue | पुतळा बनून स्वागतासाठी उभा राहतो विजय

पुतळा बनून स्वागतासाठी उभा राहतो विजय

googlenewsNext
ठळक मुद्देकलेतून उदरनिर्वाह । लग्न समारंभात मागणी

विष्णू दुनेदार ।
तुळशी : एक तरी कला असावी अंगी, असे म्हटले जाते. प्राचीन काळापासून कला हे मानवी जीवनाचे अंग बनले आहे. एखादा जिवंत व्यक्ती डोळ्याची पापणी न हलवता, गुदगुल्या लावल्यानंतरही हालचाल न करता पुतळ्याप्रमाणे दोन तास स्थिर राहत असेल तर ती एक कलाच आहे. अशी कला सुध्दा मानवाला आकर्षित करु शकते. अशीच कला देसाईगंज तालुक्याच्या कोकडी येथील एका व्यक्तीकडे असून लग्नसमारंभात पोटासाठी जिवंत माणसाचा पुतळा बनुन स्वागतासाठी उभा राहतो. त्याचे नाव आहे विजय लहानुजी टिकले. ही त्याची अंगभूत कला आता त्याच्यासाठी उत्पन्नाचे साधन बनले आहे.
विवाह एक संस्कार आहे. मुलीचा विवाह सोहळा प्रत्येक मातापिता आपल्या ऐपतीप्रमाणे आकर्षक करण्याचा प्रयत्न करीत असतात. फुलवारी, आकर्षक विद्युत रोषणाही यासह स्वागतासाठी सज्ज असलेल्या जिवंत माणसाचा पुतळा याची आता क्रेझ वाढली आहे. अशी कला अवगत असलेल्या विजयला लग्न समारंभात स्वागतासाठी हमखास बोलविल्या जात आहे. यासाठी विजय तीन तासाचे आठशे ते हजार रुपये मानधन घेतो. लोक मात्र विजयच्या या कलेचे कौतूक करतात.
परसरामजी टिकले यांनी विजयला वेशभूषा उपलब्ध करुन दिली. सुरवातीला अतिशय कमी मानधनावर त्यांनी आपली कला दाखवली. त्याची कला जस-जशी कौतूकास पात्र ठरत गेली तसतशी विवाह सोहळ्यात जिवंत माणसाचा पुतळा होऊन स्वागतासाठी मागणी वाढत गेली.
आतापर्यंत विजयने जवळपास ३०० विवाह सोहळ्यास उपस्थित राहून आपली कला दाखविली आहे. या कलेने त्याला आजपर्यंत विदर्भातील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गोंदीया या जिल्ह्यासह बालाघाट, छत्तीसगड या ठिकाणी कला दाखविण्यासाठी पोहचवले आहे. विजयची कला रोजगाराचे साधन बनले असून त्याला त्याच्या कुटुंबाचे सहकार्य मिळत आहे.

Web Title: Vijay stands up for the statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :artकला