विलास तांबे पुरस्काराने सन्मानित
By admin | Published: June 26, 2017 01:13 AM2017-06-26T01:13:42+5:302017-06-26T01:13:42+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत उच्चत्तम शेती तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी डॉ. विलास तांबे यांनी केलेल्या प्रयत्नांची
कृषी कार्याची दखल : संशोधित वाण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील
शेतकऱ्यांपर्यंत उच्चत्तम शेती तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी डॉ. विलास तांबे यांनी केलेल्या प्रयत्नांची आंतरराष्ट्रीय सामाजिक व आर्थिक सुधार संस्था बंगलोरने दखल घेऊन डॉ. तांबे यांना डॉ. अब्दुल कलम जीवन गौरव पुरस्कार देऊन २४ जून रोजी बंगलोर येथे सन्मानित करण्यात आले.
डॉ. विलास तांबे हे कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली येथे कार्यक्रम समन्वयक तसेच सहयोगी प्राध्यापक (कीटकशास्त्र) म्हणून कार्यरत आहेत. धान, तूर, हरभरा, लाखोळी, मोहरी या पिकांचे नवीन संशोधित वाण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतकरी मेळावे, कृषी दिन, किसान गोष्टी, प्रक्षेत्र भेटींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती दिली. त्यांच्या या कृषीविषयक कार्याची दखल घेऊन सन्मानित करण्यात आले. कन्नड दिग्दर्शक सीतारामन, अभिनेत्री भवानी प्रकाश यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी केंद्रीय मंत्री डी. व्ही. सदानंद गवडा, उद्योगपती अनिल कुमार मालपाणी, संस्थेचे अध्यक्ष शिवअप्पा उपस्थित होते.