२३ ग्रामसेवकांना बनवणार ग्राम विकास अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:28 AM2021-05-30T04:28:21+5:302021-05-30T04:28:21+5:30
ग्रामसेवकांच्या सेवाज्येष्ठता यादीबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली हाेती. त्यामुळे २०१४ पासून पदाेन्नतीची प्रक्रिया राबाविण्यात आली ...
ग्रामसेवकांच्या सेवाज्येष्ठता यादीबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली हाेती. त्यामुळे २०१४ पासून पदाेन्नतीची प्रक्रिया राबाविण्यात आली नव्हती. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रलंबित पदाेन्नती संबंधातील बाब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या लक्षात आणून दिली. सीईओ यांनी न्यायालयात दाखल याचिका व शासन निर्णयातील तरतुदी यांचा अभ्यास करून ग्रामसेवकांना वेळीच पदाेन्नती देण्यासंदर्भात विभागीय पदाेन्नती समितीची सभा आयाेजित केली. सभेत २३ ग्रामसेवकांना ग्रामविकास अधिकारी पदावर पदाेन्नतीकरिता पात्र ठरविले आहे. याबाबतचे आदेश लवकरच निर्गमित केले जाणार आहेत. सदर पदाेन्नती प्रक्रिया अगदी पारर्दशकरीत्या राबविण्यात आली आहे. यामध्ये काेणत्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन झाले नाही. सर्व पात्र कर्मचाऱ्यांना नियमानुसार पदाेन्नती देण्यात आली आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे.
कर्मचाऱ्यांचे विनंती अर्ज, भूतकाळातील प्रशासकीय सेवाविषयक तपशील याचा परिपूर्ण विचार करून पदाेन्नती देण्यात आली आहे. जिल्ह्यात अत्यावश्यक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये पदस्थापना दिली जाणार आहे. काेणत्याही खाेट्या अफवेला ग्रामसेवकांनी बळी पडू नये. याबाबत त्रयस्थ व्यक्तीकडून पैशाची मागणी झाल्यास ०७१३२-२२२३०४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. अथवा लेखी तक्रार बंद लिफाफ्यात दाखल करावी. तक्रार करणाऱ्याचे नाव गाेपनीय राहील, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
पदाेन्नतीची प्रक्रिया राबविण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन ) फरेंद्र कुत्तीरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत ) माणिक चव्हाण, सहायक प्रशासन अधिकारी धनंजय दुमपेटीवार, बापूजी घाेडमारे, रितेश वनमाळी, विशांत कुंभारे, सचिन मांडवगडे, राम नन्नावरे, संताेष नैताम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
काेट
इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच ग्रामसेवक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक लाभांचा आढावा नियमित घेण्यात येत आहे. सद्यस्थितीत सुरू असलेल्या काेराेना विषाणू संसर्ग काळात ग्रामसेवक उत्तम भूमिका पार पाडत असल्याने त्यांना प्राेत्साहन देण्यास व उत्तम प्रशासकीय सेवा देण्यास इतरही प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
- कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिराेली