मजुरांच्या मदतीसाठी सरसावले गावकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 05:00 AM2020-04-12T05:00:00+5:302020-04-12T05:00:40+5:30

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर या शेतमजुरांचे चांगलेच हाल झाली. तेलंगणातील लोक त्यांना आपल्या गावात घेण्यास तयार नव्हते. त्यात प्रवासी वाहतूक बंद. अशावेळी पायीच गावाचा रस्ता पकडण्याशिवाय पर्याय नव्हता. या मजुरांनी हिंमत ठेवत आपल्या गावातील लोकांशी आणि जिल्हा परिषद कृषी सभापती रमेश बारसागडे, सामाजिक कार्यकर्ते अरु ण कुनघाडकर यांच्याशी संपर्क ठेवला.

The villagers rush to help the laborers | मजुरांच्या मदतीसाठी सरसावले गावकरी

मजुरांच्या मदतीसाठी सरसावले गावकरी

Next
ठळक मुद्दे२५० किमीची पायपीट । तेलंगणातून येताच विलगीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : पोटाची खळगी भरण्यासाठी तालुक्यातील कुनघाडा (रै) येथील १२ शेतमजूर तेलंगणा राज्यातील अदिलाबाद जिल्ह्यातल्या निरदगोंडा गावात मजुरी करण्यास गेले होते. पण लॉकडाऊननंतर राज्यांच्या सीमा सिल होऊन मजुरीही बंद झाली. कमावलेला पैसाही खर्च झाला. अखेर त्यांनी तब्बल २५० किलोमीटरचे अंतर पायी पार करत आपले गाव गाठले. अनेक गावांमध्ये बाहेरून आलेल्या व्यक्तीला प्रवेश नाकारला जात असताना या गावकऱ्यांनी मात्र त्यांना सर्वतोपरी मदत करून त्यांचे गावातच विलगीकरणही केले.
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर या शेतमजुरांचे चांगलेच हाल झाली. तेलंगणातील लोक त्यांना आपल्या गावात घेण्यास तयार नव्हते. त्यात प्रवासी वाहतूक बंद. अशावेळी पायीच गावाचा रस्ता पकडण्याशिवाय पर्याय नव्हता. या मजुरांनी हिंमत ठेवत आपल्या गावातील लोकांशी आणि जिल्हा परिषद कृषी सभापती रमेश बारसागडे, सामाजिक कार्यकर्ते अरु ण कुनघाडकर यांच्याशी संपर्क ठेवला. त्यांनी त्यांना हिंमत देत तेथील सरकारकडून काही मदतही करण्याचा प्रयत्न केला. मात्र गावात परत आल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.
अखेर मजल-दरमजल करत सकाळी हे मजूर महाराष्टÑाच्या वेशीवर आले. अरु ण कुनघाडकर यांनी त्यांना कुनघाडापर्यंत आणण्यासाठी आमदार डॉ.देवराव होळी यांच्याशी संपर्क केला. डॉ.होळी यांनी लगेच त्या मजुरांसाठी अ‍ॅम्बलन्स पाठवून त्यांना गावापर्यंत नेऊन सोडण्याची आणि गावातच सुरक्षित विलगीकरण करण्याची सूचना केली. तहसीलदार संजय गंगथळे, नायब तहसीलदार तंगुलवार व तालुका आरोग्य अधिकारी यांनाही याबाबतची माहिती देण्यात आली. त्यांनी सर्वाची कुनघाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून आवश्यक औषधोपचारही केला. सर्वांचे सुरक्षित विलगीकरण करण्यात आले. यावेळी कुनघाडाचे सरपंच अविनाश चलाख, पोलीस पाटील दिलीप शृंगारपवार यांच्यासह गावकऱ्यांनीही मोलाचे सहकार्य केले.

एकीकडे अनेक गावात सध्या बाहेरून आलेल्या नागरिकांकडे शंकेने पाहून त्यांना गावात प्रवेशही दिला जात नाही. परंतु कुनघाडा येथील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व गावकºयांनी त्या १२ मजुरांना मानविय दृष्टिकोनातून मदत करून त्यांच्या आरोग्यासाठी सुरक्षित विलगीकरण केले. त्यांची ही माणुसकी इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

Web Title: The villagers rush to help the laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Labourकामगार