वडधात ग्रामस्थांनी केली दारूची होळीचार दारू विक्रेत्यांवर कारवाई : गावकºयांनी केला दारूबंदीचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 12:23 AM2017-09-08T00:23:00+5:302017-09-08T00:24:34+5:30

येथील गावकºयांनी संघटन शक्ती दाखवत चार दारू विक्रेत्यांच्या घरी बुधवारी धाड टाकून दारू जप्त केली. जप्त केलेली दारू गावकºयांनी चौकात आणून तिची होळी केली.

Villagers take action against liquor barrels of liquor: villagers decide to slaughter liquor | वडधात ग्रामस्थांनी केली दारूची होळीचार दारू विक्रेत्यांवर कारवाई : गावकºयांनी केला दारूबंदीचा निर्धार

वडधात ग्रामस्थांनी केली दारूची होळीचार दारू विक्रेत्यांवर कारवाई : गावकºयांनी केला दारूबंदीचा निर्धार

googlenewsNext
ठळक मुद्देजप्त केलेली दारू गावकºयांनी चौकात आणून तिची होळी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी/वडधा : येथील गावकºयांनी संघटन शक्ती दाखवत चार दारू विक्रेत्यांच्या घरी बुधवारी धाड टाकून दारू जप्त केली. जप्त केलेली दारू गावकºयांनी चौकात आणून तिची होळी केली. गावात दारूबंदी झालीच पाहिजे, अशा गर्जनाही दिल्या. त्यामुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
आरमोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेश पाटील व मुक्तीपथ कार्यकर्त्यांनी वडधा येथे बुधवारी ग्रामसभा आयोजित केली होती. यामध्ये गावातील अवैध दारू विक्री करणाºयांना ग्रामसभेत उभे करण्यात आले व त्यांना दारू विक्री बंद करण्याबाबत समज देण्यात आली. व्यसनमुक्ती संघटनेतील महिलांच्या पुढाकाराने दारू विक्रेत्यांच्या घरी जाऊन दारू शोधली. गावातील महिला, पुरूष, युवक युवती यांचा जमाव दारू विक्रेत्यांच्या घरापर्यंत पोहोचला. चार दारू विक्रेत्यांच्या घरावर छापे टाकून लपवून ठेवलेली दारू जप्त केली. दारूच्या बॉटल गोळा करून वडधा येथील मुख्य चौकात आणल्या व या सर्व बॉटल तसेच दारूच्या कॅनला आग लावली. दारू
विक्रेत्यांना वेळोवेळी नोटीस देऊनही दारू विक्रेते छुप्या पध्दतीने दारू विक्री करीतच होते. त्यामुळे गावात दारूबंदी होत नव्हती. गावातील नागरिक व महिला प्रचंड संतप्त होते. दारू कायमची हद्दपार करण्याच्या उद्देशानेच दारू विक्रेत्यांच्या घरावर छापे टाकण्यात आले. यानंतर दारूची विक्री करणार नाही, अशा प्रकारच्या संमतीपत्रावर त्यांची स्वाक्षरी सुध्दा घेण्यात आली. यावेळी मुक्तीपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, ठाणेदार महेश पाटील, मुक्तीपथ संघटनेच्या शारदा सहाकारे यांनी नागरिकांना मार्गदर्शन करताना दारूबंदी विषयी प्रेरीत केले. यावेळी निलम हरीणखेडे, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समितीचे सदस्य व यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

Web Title: Villagers take action against liquor barrels of liquor: villagers decide to slaughter liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.