विसापूर-काेटगल मार्गावरील रपटा तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:33 AM2021-01-22T04:33:07+5:302021-01-22T04:33:07+5:30
गडचिराेली : विसापूर -काेटगल मार्गावरील सिमेंट रपटा अवजड वाहनांमुळे तुटला. त्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी भगदाड पडले. रपटा तुटल्याने येथून आवागमन ...
गडचिराेली : विसापूर -काेटगल मार्गावरील सिमेंट रपटा अवजड वाहनांमुळे तुटला. त्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी भगदाड पडले. रपटा तुटल्याने येथून आवागमन करणाऱ्या वाहनांचा अपघात हाेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे रपट्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विसापूर-काेटगल मार्गावर राईसमिल तसेच अन्य प्रतिष्ठाने आहेत. येथून अवजड वाहने ये-जा करीत असतात. यापूर्वीसुद्धा रपटा तुटला हाेता; परंतु पक्की दुरुस्ती न करता मुरूम टाकून बुजविण्यात आले. मुरूम टाकल्याने आईस्क्रीम फॅक्टरीतून निघणारे सांडपाणी परिसरात साचत आहे. या सांडपाण्याच्या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. एमआयडीसी प्रशासनाने या ठिकाणी मुरूम न टाकता नव्याने रपट्याचे बांधकाम करावे, अशी मागणी विसापूर, काेटगल, इंदाळा, पारडी येथील नागरिकांनी केली आहे.