गडचिरोलीत येणार लोकजागर यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 12:04 AM2018-10-01T00:04:09+5:302018-10-01T00:04:54+5:30
लोकजागर अभियानातर्फे संपूर्ण विदर्भात लोकजागर यात्रा काढण्यात येणार असून २७ नोव्हेंबर रोजी ही यात्रा गडचिरोलीत पोहोचणार आहे. या यात्रेत ओबीसी प्रवर्गातील सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ओबीसी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लोकजागर अभियानाचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लोकजागर अभियानातर्फे संपूर्ण विदर्भात लोकजागर यात्रा काढण्यात येणार असून २७ नोव्हेंबर रोजी ही यात्रा गडचिरोलीत पोहोचणार आहे. या यात्रेत ओबीसी प्रवर्गातील सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ओबीसी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लोकजागर अभियानाचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी केले.
शनिवारी येथील विश्रामगृहात लोकजागर अभियानाबाबत सभा आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सभेच्या अध्यक्षस्थानी अरूण मुनघाटे होते. शाल्ोिकराम विधाते, देवराव म्हशाखेत्री, देवाजी सोनटक्के, नगरसेवक सतीश विधाते, पंडीतराव पुडके, प्रभाकर वासेकर, पांडुरंग घोटेकर, अॅड. संजय ठाकरे, देवानंद कामडी, राजेश चन्नावार, रमेश भुरसे, दादाजी चुधरी, पुरूषोत्तम ठाकरे, देवराव म्हशाखेत्री, गोपीनाथ चांदेवार, सुरेश भांडेकर, दत्तात्रय खरवडे, देवाजी सोनटक्के, दत्तात्रय बर्लावार, पांडुरंग घोटेकर, गोविंदराव बानबले, प्रा. शेषराव येलेकर, प्राचार्य खुशाल वाघरे आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. ज्ञानेश वाकुडकर म्हणाले, ५२ टक्के ओबीसी असलेल्या महाराष्टÑाचा आजपर्यंत एकही ओबीसी मुख्यमंत्री झाला नाही. ओबीसी समाजाला आरक्षणाच्या बाबतही असाच पक्षपात सहन करावा लागत आहे. महाराष्ट्रामध्ये ओबीसींना केवळ १६ टक्के आरक्षण मिळत आहे. नोकऱ्यांमध्येही ओबीसींचा मोठा बॅकलॉग आहे. ओबीसींवरील हा अन्याय दूर करण्यासाठी ओबीसी मुख्यमंत्री होऊन बहुजनांचे सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने लोकजागर यात्रेतून जनजागृती सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. २४ नोव्हेंबरपासून नागपूर येथून विदर्भव्यापी लोकजागर यात्रेचा शुभारंभ होत असून ५ डिसेंबरला वर्धा येथे या यात्रेचा समारोप होणार आहे, असे वाकुडकर यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी ओबीसी समाजाच्या आगामी रणनितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.