जनमैत्रीअंतर्गत प्रेक्षणीय स्थळांना भेटी
By admin | Published: March 28, 2017 12:40 AM2017-03-28T00:40:29+5:302017-03-28T00:40:29+5:30
कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी पोलीस विभागाला मदत करणाऱ्या युवकांसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जनमैत्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पोलीस विभागाचा उपक्रम : वैरागड किल्ल्याची जाणली माहिती
वैरागड : कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी पोलीस विभागाला मदत करणाऱ्या युवकांसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जनमैत्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील प्रेक्षणीय स्थळांना पोलीस विभागाच्या मार्फत सदर नागरिक भेटी देत आहेत. नुकतेच या पथकाने वैरागड किल्ल्याला भेट दिली.
उपविभागीय पोलीस अधिकारी सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात जणमैत्री मेळावा आयोजित केला आहे. या नागरिकांनी भंडारेश्वर मंदिर, गोरजाई मंदिर, वैरागडचा ऐतिहासिक किल्ल्याला भेटी दिल्या. यावेळी आरमोरीचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, बिट जमादार देवराव सहारे, बंडू कोसरे, पोेलीस उपनिरीक्षक एस. व्ही. खटके, डोंगरवार, गेडाम, हलामी, पोलीस पाटील भानारकर उपस्थित होते. या अभ्यास दौऱ्यात घोट, रेगडी, पोटेगाव, चामोर्शी, करंजी या भागातील नागरिक उपस्थित होते. बाहेरची संस्कृती झालेला विकास दाखविणे हा मुख्य उद्देश यामागे आहे. जनमैत्री मेळाव्याला ग्रामीण भागातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. (वार्ताहर)