दुर्गम भागातील मतदारांना होणार माऊस, पेनड्राईव्ह, एसीची ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:36 AM2021-01-03T04:36:26+5:302021-01-03T04:36:26+5:30

(बॉक्स) आधुनिक वापरातील अनेक वस्तूदर्शक चिन्हांची भर - नव्याने समावेश केलेल्या चिन्हांमध्ये संगणकाचा माऊस, संगणक, क्रेन, डिझेल पंप, डिश ...

Voters in remote areas will be introduced to mouse, pen drive, AC | दुर्गम भागातील मतदारांना होणार माऊस, पेनड्राईव्ह, एसीची ओळख

दुर्गम भागातील मतदारांना होणार माऊस, पेनड्राईव्ह, एसीची ओळख

Next

(बॉक्स)

आधुनिक वापरातील अनेक वस्तूदर्शक चिन्हांची भर

- नव्याने समावेश केलेल्या चिन्हांमध्ये संगणकाचा माऊस, संगणक, क्रेन, डिझेल पंप, डिश अँटेना, एक्स्टेंशन बोर्ड अशा वस्तूंची भर पडली आहे. या वस्तू दुर्गम भागातील नागरिकांना पहिल्यांदाच चिन्हांच्या रूपाने पाहायला मिळतील.

- ग्रामीण आणि त्यातही भागात ग्रामपंचायतसारख्या छोट्या निवडणुकीत उमेदवार पोस्टर, पॉम्प्लेट छापत नाही. त्यामुळे केवळ मौखिक प्रचारावर ते विसंबून असल्यामुळे त्यांना नवीन निवडणूक चिन्ह मिळाल्यास अशिक्षित मतदारांना ते लक्षात ठेवणे कठीण जाणार आहे.

- निवडणूक अधिकाऱ्याकडे १९० चिन्हांचा पर्याय असल्याने ते कोणकोणत्या चिन्हांचा वापर करतात, यावरही उमेदवारांचे भवितव्य ठरण्याची शक्यता आहे.

(बॉक्स)

अशी आहेत वेगवेगळी चिन्ह

- निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दिलेल्या विविध चिन्हांमध्ये पतंग, गॅस सिलिंडर, अंगठी, रोड रोलर अशा अनेक चिन्हांची नागरिकांना ओळख आहे.

- याशिवाय पंखा, खटारा, फुटबॉल, चष्मा, चावी असे चिन्हही लोकांना माहीत आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत हे चिन्ह मतदारांनी पाहिले आहेत.

- नागरिकांच्या जीवनमानाशी निगडित आणि त्यांना जास्त परिचयाचे चिन्ह मिळावे यावर उमेदवारांचा डोळा राहणार आहे. पण त्याबाबतची निवड करणे त्यांच्या हाती राहणार नाही.

(बॉक्स)

वेगवेगळ्या चिन्हांवर लढावे लागणार

ग्रामपंचायतची निवडणूक पक्षीय चिन्हावर होत नाही. त्यामुळे उमेदवारांची एखाद्या पक्षाशी कितीही जवळीकता असली तरी त्या पक्षाचे चिन्ह त्याला मिळणार नाही. याशिवाय पॅनलमधील सर्व उमेदवारांना सारखे चिन्ह मिळणार नाही. सर्वांना वेगवेगळ्या चिन्हावर लढावे लागणार आहे.

कोट

यादीतील अनुक्रमानुसार उमेदवारांना चिन्हांचे वाटप होईल. असे असले तरी कुणाला कोणते चिन्हे द्यायचे याचा सर्वाधिकार संबंधित निवडणूक अधिकाऱ्याचा असतो. मात्र एका प्रभागात दोन उमेदवारांना सारखे चिन्ह मिळायला नको याची दक्षता घ्यावी लागणार आहे.

- कल्याणकुमार डहाट

तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी, आरमोरी

Web Title: Voters in remote areas will be introduced to mouse, pen drive, AC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.