कडक पोलीस बंदोबस्ताने मतदान वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 10:28 PM2019-04-19T22:28:03+5:302019-04-19T22:28:39+5:30

भामरागड तालुक्यातील निम्म्याहून अधिक मतदान केंद्र नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहेत. पोलीस विभागाने मतदानाच्या दिवशी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तसेच बिनधास्तपणे मतदान करावे, असे आवाहन पोलीस विभागाने नागरिकांना केले होते.

Voting increased due to strict police settlement | कडक पोलीस बंदोबस्ताने मतदान वाढले

कडक पोलीस बंदोबस्ताने मतदान वाढले

Next
ठळक मुद्देनक्षल शोधमोहीम केली तीव्र : भामरागड पोलिसांनी मतदानाचे महत्त्व पटविले

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : भामरागड तालुक्यातील निम्म्याहून अधिक मतदान केंद्र नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहेत. पोलीस विभागाने मतदानाच्या दिवशी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तसेच बिनधास्तपणे मतदान करावे, असे आवाहन पोलीस विभागाने नागरिकांना केले होते. त्यामुळे रखरखत्या उन्हातही भामरागड तालुक्यातील जनतेने मतदान केले. परिणामी मतदानाची टक्केवारी वाढली आहे.
नक्षल्यांचा लोकशाहीला विरोध असल्याने निवडणुकीदरम्यान त्यांच्याकडून घातपाताच्या घटना घडवून आणल्या जातात. अशाप्रकारच्या घटना घडल्यानंतर नागरिक मतदान करणार नाही, असा त्यांचा अंदाज राहतो. नक्षल्यांचा हा बेत हाणून पाडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या नेतृत्त्वात पोलिसांनी मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पोलीस संरक्षणातच पोलिंग पार्ट्या मतदान केंद्रांवर पोहोचविण्यात आल्या. मतदानाच्या १५ दिवसांपूर्वीपासूनच नक्षल शोधमोहीम राबवून मतदान केंद्राच्या परिसरातील जंगल पोलिसांनी पिंजून काढला होता. पोलिसांचे नियोजन व वाढलेली ताकद लक्षात घेऊन नक्षल्यांच्याही मनात धडकी भरली.
गावातील नागरिकांच्या घरी जाऊन लोकशाहीमध्ये मतदानाचे असलेले महत्त्व पटवून दिले. प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिला आहे. हा अधिकार प्रत्येक व्यक्तीने बजावावा. नक्षल्यांच्या धमक्यांना भीक घालू नये, पोलीस सामान्य नागरिकांचे संरक्षण करण्यास सक्षम आहेत, असे आवाहन केले. त्यामुळे नागरिक मतदानासाठी तयार होऊन बिनधास्तपणे मतदान केले. दुर्गम भागातील पोलिंग पार्ट्या हेलिकॉप्टरने बेस कॅम्पपर्यंत पोहोचविण्यात आल्या. हेलिकॉप्टरच्या सभोवतालही पोलिसांचा कडक पहारा होता. पोलीस प्रशासनाने घेतलेल्या मेहनतीमुळे भामरागडसारख्या नक्षलग्रस्त भागातील मतदान शांततेत पार पडले. यासाठी एसडीपीओ तानाजी बरडे यांच्यासह ताडगावचे प्रभारी अधिकारी समीर दाभाडे, पोलीस उपनिरीक्षक राहूल नामदेवे, महिला पीएसआय पुनम गोरे, सीआरपीएफचे असिस्टंट कमांडर मुनीर खान, हरिश्चंद्र मनोरी यांनी नियोजन केले.

Web Title: Voting increased due to strict police settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.