माल्लेरमालमध्ये गिधाडांचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 01:35 AM2018-01-07T01:35:44+5:302018-01-07T01:35:57+5:30

चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा माल वनपरिक्षेत्रात येणाऱ्या माल्लेरमाल येथील कक्ष क्र. ११० च्या वनक्षेत्रात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुर्मिळ गिधाड पक्षी आढळून आले.

Vultures in Mallemamal | माल्लेरमालमध्ये गिधाडांचा वावर

माल्लेरमालमध्ये गिधाडांचा वावर

Next
ठळक मुद्देसव्वाशेवर गिधाडे आढळली : नागपूरच्या अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिली भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा माल वनपरिक्षेत्रात येणाऱ्या माल्लेरमाल येथील कक्ष क्र. ११० च्या वनक्षेत्रात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुर्मिळ गिधाड पक्षी आढळून आले. संख्येने १२० ते १४० च्या आसपास असलेल्या गिधाडांची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळताच ५ जानेवारीला नागपूरचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक के.पी. सिंग यांनी भेट देऊन पाहणी केली.
माल्लेरमाल येथील कक्ष क्र. ११० च्या वनक्षेत्रात मृत जनावरांचे मांस खाण्याकरिता परिसरातील झाडांवर तसेच समुहाने घिरट्या घालत असल्याचे गिधाड पक्षी दिसून आले. मागील अनेक वर्षानंतर माल्लेरमाल येथे गिधाड पक्षी दिसून आले. ३ जानेवारी २०१८ पासूनच १२० ते १४० च्या आसपास गिधाडांचा वावर येथे असल्याचे माल्लेरमाल येथील नागरिकांनी सांगितले. भेटीदरम्यान अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक के.पी. सिंग यांनी उपस्थित वनाधिकारी, कर्मचारी, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच पदाधिकारी व गावातील नागरिकांशी संवाद साधून गिधाडांविषयी आणखी माहिती जाणून घेतली. तसेच वनकर्मचारी व गाववासीयांकडून करण्यात येणाºया गिधाड संरक्षण व संवर्धनाच्या कामाची प्रशंसा केली. जिल्ह्यातील गिधाडांची संख्या प्रचंड घटली आहे. गिधाड अतिशय दुर्मिळ झाले आहेत. परंतु माल्लेरमाल परिसरात गिधाड आढळले. वनकर्मचारी व वनाधिकारी गावातील नागरिकांना मार्गदर्शन करून गिधाड वाचविण्यासाठी जनजागृती करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. भेटीदरम्यान गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक डब्ल्यू.आय. यॉटबान, गडचिरोलीचे उपवनसंरक्षक एस.बी. फुले, विभागीय वनाधिकारी यू.यू. वर्मा, सहायक वनसंरक्षक (रोहयो) सोनल भडके, कुनघाडाचे वनपरिक्षेत्राधिकारी जी.एम. घोंगडे, केंद्रस्थ अधिकारी मोतीराम चौधरी, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खुशालराव कावळे व नागरिक उपस्थित होते.
चार गावात बांधले पक्षी उपाहारगृह
गिधाड पक्ष्यांना जनावरांचे मांस उपलब्ध व्हावे, या उद्देशाने गडचिरोली वनविभागामार्फत संयुक्त वनव्यवस्थापन समिती येवली, दर्शनी चक यांच्या माध्यमातून येवली, दर्शनी चक, नवेगाव रै., मारकबोडी येथे गिधाड पक्षी उपहारगृह तयार करण्यात आले आहेत. या उपहारगृहांमध्ये नागरिक मेलेली जनावरे टाकतात. या जनावरांचा मोबदलाही पशुपालकांना दिला जातो. या उपहारगृहांमध्ये परिसरातील गिधाडांना ठेवण्यात आले आहे. तसेच गिधाड पक्ष्यांबाबत गावागावात जनजागृती करून त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याकरिता विविध उपक्रम राबविले जात आहे. गावकºयांचा प्रतिसाद व सहकार्य मिळत असल्यामुळे गिधाड पक्ष्यांची संख्या वाढत असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी.एम. घोंगडे यांनी सांगितले.

Web Title: Vultures in Mallemamal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.