इव्हीएम मशीनला व्हीव्हीपॅड यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 11:14 PM2018-12-20T23:14:07+5:302018-12-20T23:14:55+5:30
मतदानासाठी वापरल्या जाणाºया इव्हीएम मशीन बाबत आजपर्यंत अनेकांनी शंका उपस्थित केल्या. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत इव्हीएम मशीन सोबतच व्हीव्हीपॅड मतदान यंत्राचा वापर केला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या इव्हीएम मशीन बाबत आजपर्यंत अनेकांनी शंका उपस्थित केल्या. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत इव्हीएम मशीन सोबतच व्हीव्हीपॅड मतदान यंत्राचा वापर केला जाणार आहे. मतदान केल्यानंतर आपण ज्या चिन्हाला मतदान केले ते व्हीव्हीपॅड यंत्राच्या स्क्रिनवर ७ सेकंद दिसणार आहे. त्यानंतर मतदानाची पावती यंत्रात पडणार आहे. त्यामुळे या यंत्राबाबत मतदारांमध्ये असलेली शंका आता दूर होणार आहे. या यंत्राबाबत गडचिरोली जिल्हा प्रशासन आरमोरी, गडचिरोली, अहेरी या तीनही विधानसभा क्षेत्रात जनजागृती करणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुढे माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यासाठी १ हजार १७१ व्हीव्हीपॅड यंत्र पुरवठा झाला आहे. या यंत्रांची तपासणी व ट्रायल घेतल्यानंतर सगळे यंत्र त्या-त्या उपविभागात पाठवण्यात आले आहेत.
या यंत्राबाबत नागरिकांना माहिती व्हावी यासाठी आरमोरी, गडचिरोली, अहेरी या तीनही विधानसभा क्षेत्रामध्ये जनजागृतीसाठी एक महिना विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी ७४९ गावांची निवड करण्यात आली असून ३७ पथक गठित करण्यात आले आहेत. ११ वाहनांद्वारे त्या-त्या विधानसभा क्षेत्रांमध्ये व्हीव्हीपॅड यंत्राची जनजागृती करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकाºयांनीे सांगितले.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे उपस्थित होते.