वीज टॉवर उभारणीचा मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 11:21 PM2017-11-13T23:21:29+5:302017-11-13T23:21:48+5:30

देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील काही शेतकºयांच्या शेतातून वीज टॉवर गेले आहे. ज्या शेतकºयांची जमीन गेली आहे.

Wages for power tower constructions | वीज टॉवर उभारणीचा मोबदला द्या

वीज टॉवर उभारणीचा मोबदला द्या

Next
ठळक मुद्देकाम बंद पाडण्याचा इशारा : आमगावातील शेतकºयांना दिली तुटपुंजी रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील काही शेतकºयांच्या शेतातून वीज टॉवर गेले आहे. ज्या शेतकºयांची जमीन गेली आहे. त्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, अन्यथा उभारलेल्या टॉवर तार लाऊ देणार नाही, असा इशारा आमगाव येथील शेतकºयांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
रायपूर-राजनांदगाव-वरोरा कंपनीने वीज टॉवर उभारण्याठी १२ शेतकºयांची जमीन ताब्यात घेऊन त्यावर टॉवर उभे केले आहे. काही टॉवरवर अर्धवट तारा ओढण्यात आल्या आहेत. टॉवर उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. त्याची भरपाई म्हणून कंपनीने मोबदला दिला आहे. मात्र एकाच शेतकºयाच्या शेताचे मोजमाप व पंचनामा करून मोबदला दिला. इतर शेतकºयांच्या शेताचे मोजमाप करण्यात आले नाही. २२ बाय २२ चौरस मीटर जागेत टॉवर उभारण्यात येत आहे. यामध्ये शेतकºयांची लाखो रूपयांची जमीन गेली आहे. मात्र शेतकºयांना अत्यंत कमी किंमत देण्यात आली आहे. शासनाच्या नियमानुसार पैसे दिले नाही. कंपनीचे डेप्युटी मॅनेजर हे शेतकºयांना धमक्या देत आहेत.
शासकीय कामात अडथळा करण्याचा आपला उद्देश नसून शासनाच्या नियमानुसार मोबदला देण्यात यावा, अन्यथा आपण काम बंद पाडू, असा इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेला आमगाव येथील शेतकरी वामन कुथे, अनिल निकम, छगण आडे, अशोक ठाकरे, प्रभाकर नवघरे, विलास झरकर, शंकर घोडमारे, नामदेव ढोले, श्रावण देशमुख उपस्थित होते.

Web Title: Wages for power tower constructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.