वैनगंगा नदी मासेमारांसाठी ठरतेय वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:37 AM2021-02-16T04:37:11+5:302021-02-16T04:37:11+5:30

आरमाेरी : गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वैनगंगा नदीमुळे सिंचनाची साेय तर झाली आहेच. याशिवाय मासेमारी व्यवसायातूनही ...

Wainganga river is a boon for fishermen | वैनगंगा नदी मासेमारांसाठी ठरतेय वरदान

वैनगंगा नदी मासेमारांसाठी ठरतेय वरदान

Next

आरमाेरी : गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वैनगंगा नदीमुळे सिंचनाची साेय तर झाली आहेच. याशिवाय मासेमारी व्यवसायातूनही वर्षभराचा राेजगार प्राप्त झाला आहे. आरमाेरी तालुक्याच्या अनेक गावातील मच्छीमार बांधव या व्यवसायावरच आपली उपजीविका करतात. शंकरनगर परिसरातील शेकडाे भूमिहीन बेराेजगारांसाठी वैनगंगा नदी जीवनदायिनी ठरत आहे. विशेष म्हणजे बर्ड फ्लूच्या भीतीमुळे गेल्या महिनाभरापासून माशांची मागणी वाढली आहे. आरमाेरी तालुक्याच्या शंकरनगर, सालमारा, रामपूर, रवी, अरसाेडा येथील शेकडाे भूमिहीन बेराेजगार व मच्छीमार वैनगंगा नदीत दरराेज मासेमारी करतात. वैनगंगा नदीत मासेमारीकरिता गेल्यानंतर ते रिकाम्या हाताने परत येत नाहीत. बारमाही वाहणारी ही नदी मासेमार बांधवांसाठी वरदान ठरत आहे. नदीत असंख्य डाेह तसेच खाेलवर पाण्याचे खडकाळ भाग आहेत. खाेलवर पाण्यात राेहू, कतला, मरट, झिंगे आदी प्रजातींचे मासे आढळतात. तीन ते चार किलाेग्रॅमपासून १८ ते २० किलाेपर्यंतच्या घाेगर व जरंग मासे पाहावयास मिळतात. अतिशय दुर्मीळ मासेसुद्धा येथे दिसून येतात.

बाॅक्स...

नावेद्वारे हाेते मासेमारी

आरमाेरी तालुक्यात भूमिहीन बेराेजगार दिवसा तसेच रात्रीच्या सुमारास डाेंग्याद्वारे धाेकादायक मासेमारी करतात. एकदा डाेंग्याद्वारे नदीपात्रात पाेहाेचल्यानंतर रिकाम्या हाताने कुणीच परत येत नाही. पावसाळ्यातील तीन महिने नदीपात्रातील मासेमारी बंद असते. मात्र, पात्राच्या बाहेर मासेमारी केली जाते. वर्षातून जवळपास सात ते आठ महिने मासेमारी करता येते. त्यामुळे वैनगंगा नदी मासेमारांसाठी जीवनदायिनी ठरत आहे.

Web Title: Wainganga river is a boon for fishermen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.