अंधश्रद्धेची वाट सोडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2017 01:02 AM2017-04-18T01:02:53+5:302017-04-18T01:02:53+5:30
समाजात पसरत असलेली बुवाबाजी, करणी यासारख्या गोष्टींवर विश्वास न ठेवता समाजाने विकासाचा मार्ग पत्करावा.
खासदारांचे आवाहन : चामोर्शी येथे तालुकास्तरीय कार्यशाळा
चामोर्शी : समाजात पसरत असलेली बुवाबाजी, करणी यासारख्या गोष्टींवर विश्वास न ठेवता समाजाने विकासाचा मार्ग पत्करावा. व्यसनमुक्त होऊन विज्ञानाची कास धरावी व अंधश्रद्धेची वाट सोडावी, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले.
जिल्हा विकास संशोधन व कार्यान्वयन संस्था गडचिरोली तालुका शाखा चामोर्शी यांच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्ती या विषयावर चामोर्शी येथे आयोजित तालुक्यातील सरपंच व पोलीस पाटील यांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जा. कृ. बोमनवार कनिष्ठ महाविद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन खा. अशोक नेते यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे होते. प्रमुख अतिथी म्हणून पं. स. उपसभापती आकुली बिश्वास, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हेमके, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास निंबोरकर, प्रकल्प समन्वयक मनोहर हेपट, भाजयुमोचे स्वप्नील वरघंटे, डॉ. मुरलीधर बद्दलवार, सुरेश मांडवगडे, प्राचार्य महेश तुम्पल्लीवार, भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप चलाख उपस्थित होते.
राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती, पर्यावरण संतुलन, ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. समाजात दिवसेंदिवस अंधश्रद्धा अधिक दृढ होत आहे. स्थानिक पातळीवर अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी. जे. सातार, संचालन प्रा. दिलीप सोमनकर तर आभार सातार यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे कार्याध्यक्ष कागदेलवार, उपाध्यक्ष मोरेश्वर चलकलवार, गण्यारपवार, सचिन मरस्कोल्हे, सुखराम साखरे, कागदेलवार, आकरे, किशोर पातर, मदन नैैताम, गव्हारे, आशिष पिपरे, कावटकर, मेडपल्लीवार, वैैष्णवी राऊत, कल्पना गजभिये, गीता गद्दे, भारती उपाध्ये, अल्का उपासे, कविता झाडे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)