विदर्भाच्या काशीची वाट झाली खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:44 AM2021-09-08T04:44:27+5:302021-09-08T04:44:27+5:30

चामोर्शी-मार्कंडादेव रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबर उखडून त्यातील गिट्टी, मुरूम निघून खड्डे पडले आहेत. खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असून या ...

The wait for Vidarbha's Kashi was tough | विदर्भाच्या काशीची वाट झाली खडतर

विदर्भाच्या काशीची वाट झाली खडतर

Next

चामोर्शी-मार्कंडादेव रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबर उखडून त्यातील गिट्टी, मुरूम निघून खड्डे पडले आहेत. खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असून या डांबरी मार्गाची पूर्ण वाट लागली आहे. या मार्गावर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मार्कंडादेव येथे विदर्भ व राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक दर्शनासाठी दररोज भाविक येत असतात मात्र रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्याने वाहनधारक भाविकांना मार्कंडादेव तीर्थस्थळी पोहोचणे कठीण झाले आहे. या रस्त्याची नव्याने बांधणी करावी, अशी मागणी मार्कंडादेव येथील नागरिक व भाविकांनी केली आहे .

चामोर्शी - मार्कंडादेव, चामोर्शी व्हाया शंकर हेटी तसेच फराडा व मार्कंडादेव, फोकुर्डी - मार्कडादेव, चाकलपेठ वळण व्हाया मार्कंडादेव मार्गाने दररोज भाविक येत असतात. कोरोना लॉकडाऊनमध्ये जड वाहनाच्या आवागमनाने या रस्त्याची पूर्णत वाट लागून खुड्डे पडून गिट्टी उखडली आहे. त्यामुळे रस्त्याची नव्याने बांधकाम करण्याची मागणी मार्कंडादेव येथील नागरिकांनी व भाविकांनी केली आहे .

060921\0735img_20210906_124745.jpg

मार्कडादेव रस्ता फोटो

Web Title: The wait for Vidarbha's Kashi was tough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.