९१ गावांना विद्युतीकरणाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:06 AM2017-12-28T00:06:14+5:302017-12-28T00:06:27+5:30

राज्यशासनाने प्रत्येक गाव प्रकाशमान करण्याचा निर्णय घेऊन ‘गांव-गांव बिजली, घर-घर बिजली’ चा नारा दिला आहे. मात्र जिल्हा निर्मितीच्या ३५ वर्षानंतरही जिल्ह्याचे शंभर टक्के विद्युतीकरण झाले नसून अद्यापही ९१ गावे विद्युतीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Waiting for electrification of 9 1 villages | ९१ गावांना विद्युतीकरणाची प्रतीक्षा

९१ गावांना विद्युतीकरणाची प्रतीक्षा

Next
ठळक मुद्दे३५ वर्षानंतरही जैसे थे : धानोरा, अहेरी, एटापल्ली तालुक्यातील अनेक गावांमध्ये अंधार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यशासनाने प्रत्येक गाव प्रकाशमान करण्याचा निर्णय घेऊन ‘गांव-गांव बिजली, घर-घर बिजली’ चा नारा दिला आहे. मात्र जिल्हा निर्मितीच्या ३५ वर्षानंतरही जिल्ह्याचे शंभर टक्के विद्युतीकरण झाले नसून अद्यापही ९१ गावे विद्युतीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या गावांमध्ये महावितरणचा उजेड के व्हा पडेल याची नागरिकांना प्रतीक्षा लागली आहे.
जिल्ह्यात एकंदरी १ हजार ५१५ गावे आहेत. यामध्ये गडचिरोली तालुक्यात १०७, धानोरा २१९, चामोर्शी १८६, मुलचेरा ६७, देसाईगंज ३१, आरमोरी ९१, कुरखेडा १२०, कोरची १२५, अहेरी १५८, सिरोंचा २१५, एटापल्ली १८६ व भामरागड तालुक्यात ११० गावे आहेत. महावितरण कंपनीच्या वतीने विद्युतीकरण मोहीम हाती घेण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश गावांचे विद्युतीकरण करण्यास प्रारंभ झाला. त्यानुसार बहुतांश गावांचे विद्युतीकरण करण्यात आले. मात्र भौगोलिक परिस्थितीमुळे काही गावापर्यंत विद्युत तारा पोहोचविणे जिकरीचे होऊन बसल्याने अशा गावात सौर ऊर्जेवरील विद्युत पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र देखभाल-दुरूस्तीअभावी अनेक गावात सौर ऊर्जेवरील विद्युत पुरवठा बंद पडला.
प्राप्त माहिती नुसार धानोरा तालुक्यातील २१९ गावांपैकी १९१ गावात विद्युतीकरण झाले. मुलचेरा तालुक्यातील ६७ पैकी ६४, कुरखेडा तालुक्यातील १२० पैकी ११८, कोरची तालुक्यातील १२५ पैकी १२४, अहेरी तालुक्यातील १५८ पैकी १४६, सिरोंचा तालुक्यातील ११५ पैकी १११, एटापल्ली तालुक्यातील १८६ पैकी १५३ व भामरागड तालुक्यातील ११० पैकी १०२ गावात विद्युतीकरण झाले आहे.
चार तालुक्यात १०० टक्के विद्युतीकरण
गडचिरोली, चामोर्शी, देसाईगंज, आरमोरी या तालुक्यातील सर्वच गावात १०० टक्के विद्युतीकरण झाले आहे. कुरखेडा तालुक्यातील दोन, कोरची तालुक्यातील एक, मुलचेरा तालुक्यातील तीन, सिरोंचा तालुक्यातील चार गावांचे विद्युतीकरण झाल्यानंतर ही गावेसुद्धा १०० टक्के विद्युतीकरण झालेल्या तालुक्यांच्या यादीत समाविष्ट होणार आहेत.

Web Title: Waiting for electrification of 9 1 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.