जिल्ह्यात पाण्यासाठी नाही, तर पेट्राेल-डिझेलसाठी सुरू आहे भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2022 05:00 AM2022-06-05T05:00:00+5:302022-06-05T05:00:29+5:30
मागील पाच ते सहा दिवसांपासून डेपाेमध्ये पेट्राेल व डिझेल कमी प्रमाणात उपलब्ध हाेत आहे. नगदी पैसे भरल्यानंतरही पेट्राेलचे टॅंकर पंपावर पाठविले जात नसल्याने शहरात पेट्राेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरातील काही माेजक्याच पेट्राेल पंपांवर पेट्राेल उपलब्ध राहते. त्यामुळे पेट्राेलसाठी वाहनधारकांच्या रांगा लागत आहेत. वाहनधारक या पेट्राेलपंपावरून त्या पेट्राेलपंपावर येरझारा मारत असल्याचे दिसून येत आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काही पेट्राेलियम कंपन्या पेट्राेल पंपचालकांना कमी प्रमाणात पेट्राेल व डिझेलचा पुरवठा करीत असल्याने मागील पाच दिवसांपासून शहरात पेट्राेल व डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे.
शहरातील काही माेजक्याच पेट्राेल पंपावर पेट्राेल उपलब्ध हाेत असल्याने पेट्राेलसाठी दुचाकी वाहनांच्या रांगा लागत आहेत.
पेट्राेलियम कंपन्यांचे विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी डेपाे आहेत. पेट्राेलियम कंपन्या डेपाेमध्ये पेट्राेलचा साठा करतात. त्यानंतर पेट्राेलपंप चालकांच्या मागणीनुसार पेट्राेल व डिझेलचा पुरवठा केला जाते. मात्र मागील पाच ते सहा दिवसांपासून डेपाेमध्ये पेट्राेल व डिझेल कमी प्रमाणात उपलब्ध हाेत आहे.
नगदी पैसे भरल्यानंतरही पेट्राेलचे टॅंकर पंपावर पाठविले जात नसल्याने शहरात पेट्राेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरातील काही माेजक्याच पेट्राेल पंपांवर पेट्राेल उपलब्ध राहते. त्यामुळे पेट्राेलसाठी वाहनधारकांच्या रांगा लागत आहेत.
वाहनधारक या पेट्राेलपंपावरून त्या पेट्राेलपंपावर येरझारा मारत असल्याचे दिसून येत आहे.
१ जूनला पेट्राेलपंप चालकांनी केले आंदाेलन
- पेट्राेलपंप चालकांना प्रतिलिटर डिझेल व पेट्राेलवर कमिशन दिले जाते. २०१७ पासून शासनाने कमिशनध्ये वाढ केली नाही. कमिशनमध्ये वाढ करावी. या मागणीसाठी पंपचालकांनी १ जून राेजी मालाची उचल न करण्याचे आंदाेलन केले हाेते. आता मात्र कंपन्यांकडूनच कमी प्रमाणात पेट्राेलचा पुरवठा केला जात आहे.
शेतीची मशागत कशी करायची
शेती मशागतीची बहुतांश कामे आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जातात. खरिपाच्या मशागतीला सुरुवात झाली आहे. अशातच डिझेलचाही तुटवडा निर्माण झाला आहे. येत्या आठ दिवसांमध्ये ट्रॅक्टरसाठी पुन्हा डिझेलची मागणी वाढणार आहे. डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यास शेतीच्या हंगामावर परिणाम हाेईल.
पेट्राेलियम कंपन्यांच्या डेपाेमध्ये कमी प्रमाणात पेट्राेल उपलब्ध हाेत आहे. पंपचालकांना कमी प्रमाणात पेट्राेल व डिझेल मिळत आहे. पेट्राेलसाठी पैसे भरूनही टॅंकर उपलब्ध हाेत नाही. त्यामुळे शहरात पेट्राेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- प्रमाेद पिपरे,
पेट्राेलपंप चालक