काम करण्याची मानसिकता हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 01:06 AM2018-03-08T01:06:58+5:302018-03-08T01:06:58+5:30

नॅक समितीचे कार्य हे रूचीने केले तर चांगल्या पद्धतीने घडत असते. नॅकची प्रक्रिया ही थांबणारी प्रक्रिया नसून ती सतत चालणारी प्रक्रिया आहे.

Want to Work Mindset | काम करण्याची मानसिकता हवी

काम करण्याची मानसिकता हवी

Next
ठळक मुद्देकुलगुरूंचे प्रतिपादन : नॅक मूल्यांकनावर कार्यशाळा

ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : नॅक समितीचे कार्य हे रूचीने केले तर चांगल्या पद्धतीने घडत असते. नॅकची प्रक्रिया ही थांबणारी प्रक्रिया नसून ती सतत चालणारी प्रक्रिया आहे. कठीण परिस्थितीमध्ये महाविद्यालय चालविण्यासाठी मानसिकता तयार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.व्ही. कल्याणकर यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक विभागातर्फे सुधारित ‘प्रत्ययन रचना’ या विषयावर नॅकला सामोरे जाताना पूर्व तयारी म्हणून दोनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन ६ व ७ मार्च रोजी स्थानिक शासकीय विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले. यावेळी समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. एम.आर. कुरूप, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. सी.व्ही. भुसारी, प्रभारी कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले आदी उपस्थित होते. संचालन प्रा. शिल्पा आठवले यांनी तर आभार प्रा. प्रशांत सोनवाने यांनी मानले.

Web Title: Want to Work Mindset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.