वनपाल, वनरक्षकांचे वेतन वाढविणार

By admin | Published: May 28, 2017 01:23 AM2017-05-28T01:23:33+5:302017-05-28T01:23:33+5:30

मागील अनेक वर्षांपासून वेतनवाढीची मागणी केली जात आहे. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.

Warden, Warden to increase wages | वनपाल, वनरक्षकांचे वेतन वाढविणार

वनपाल, वनरक्षकांचे वेतन वाढविणार

Next

 वनमंत्र्यांचे आश्वासन : वनपाल-वनरक्षक संघटनेचे निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील अनेक वर्षांपासून वेतनवाढीची मागणी केली जात आहे. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. वन विभागातील वनपाल व वनरक्षकांचे वेतनवाढ करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे शुक्रवारी करण्यात आली. वनपाल व वनरक्षकांची वेतनवाढ केली जाईल, असे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रसंगी दिले.
गडचिरोली येथे वन भवनाचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आले असता त्यांना पदोन्नत वनपाल व वनरक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. मागील अनेक वर्षांपासून वेतन वाढ झाली नाही. वेतनवाढीसाठी संप व आंदोलनेही करण्यात आली. मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले. परंतु आता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनपाल व वनरक्षकांचे वेतन वाढवू, असे आवासन संघटनेला दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे, वनपाल व वनरक्षक यांच्या वेतन श्रेणीत वाढ करावी. यासाठी विरोधी पक्षात असतांना विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाठपुरावा केला होता. मागील सहा वर्षांपासून वेतन वाढीसाठी संघटनेचा लढा सुरू होता. त्या लढ्याला यश येण्याची चिन्हे आहेत. निवेदन देताना महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अरुण पेंदोरकर, सुनील सोनटक्के, मोतीराम चौधरी, प्रभाकर अटकरी, सुनील पेंदोरकर व वनकर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Warden, Warden to increase wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.